Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

सर्वसमावेशक कौशल्य विकास उपक्रमाची सुरवात 

मुंबई : भारतातील अग्रगण्य B2B ई-कॉमर्स कंपनी एमजंक्शन सर्व्हिसेस लिमिटेडने  मुंबईत एका सर्वसमावेशक कौशल्य विकास उपक्रमाची सुरवात केली. विशेषत: नुकत्याच संपलेल्या ‘प्राईड मंथ’च्या पार्श्वभूमीवर, संस्थेच्या ‘विविधता आणि समावेशन’ उपक्रमांमध्ये हा एक महत्वाचा घटक आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमात सामाजिकदृष्ट्या उपेक्षित समुदायातील शंभर लाभार्थींचा समावेश असेल. LGBTQI समुदाय, आणि त्यांचे आर्थिक स्वावलंबन, तांत्रिक कौशल्य हा या शिबिराचा केंद्रबिंदू असेल. जॉर्ज टेलिग्राफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये एमजंक्शनचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) श्री अनिंदा चॅटर्जी यांनी हा उपक्रम सुरू केला. जॉर्ज टेलीग्राफ ची या उपक्रमात एमजंक्शनसह भागीदारी असेल. उपक्रमाचा उद्देश विशेषत: LGBTQI समुदायाला सक्षम बनवणे, त्यांच्या रोजगाराच्या संधी सुधारणे आणि अशा प्रकारे त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हे असेल. .

या सर्वसमावेशक अशा प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तांत्रिक कौशल्य विकास, उद्योजकता प्रशिक्षण आणि एक मार्गदर्शन कार्यक्रम(मेंटॉरशिप) यांचा समावेश आहे. मार्गदर्शक मंडळाचा उद्देश LGBTQI सहभागींना एमजंक्शन (mjunction) मधील मार्गदर्शकांसोबत जोडणे आणि विविध बाबतीत सहाय्य करणे हा असेल. ‘विविधता आणि समावेशन’ (Diversity & Inclusion)या तत्त्वांशी बांधील असलेल्या इतर समान विचारसरणीच्या संस्थांच्या सहकार्याने एमजंक्शन(mjunction)  तर्फे यशस्वी उमेदवारांसाठी विविध जॉब मेळावे आयोजित केले जातील.

हा ‘सर्वसमावेशक उपक्रम’ मुंबईनंतर भारतातील इतर प्रदेशांत नेण्याची योजना एम-जंक्शनने आखली आहे.

या उपक्रमाद्वारे सामाजिकदृष्ट्या उपेक्षित समुदायांप्रती एमजंक्शनची असलेली बांधिलकी प्रतीत होते. याचप्रमाणे या कंपनीचा आणखी एक विशेष उल्लेखनीय उपक्रम म्हणजे “प्रोजेक्ट ज्योती” ज्याद्वारे दृष्टिहीन विद्यार्थी आपली शैक्षणिक सुलभता वाढविण्यासाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग करतात. २०१८ पासून, एमजंक्शनने प्रोजेक्ट ज्योतीद्वारे सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांच्या जीवनाला परिसस्पर्श केला आहे. एमजंक्शनच्या विविध CSR उपक्रमांद्वारे,२००७ पासून सुमारे पन्नास हजारांहून अधिक व्यक्तींच्या जीवनाला विविध तऱ्हेने हातभार लावला असून त्यांचे जीवन उजळवण्यास मदत केली आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading