बजाज हाउसिंग फायनान्स सादर करत आहे संभव होम लोन्स
पुणे : बजाज हाउसिंग फायनान्सने सुरुवात केली आहे संभव होम लोन्सची- हे प्रॉडक्ट ग्राहकांना किफायतशीर आणि सुलभ हाउसिंग फायनान्स पुरवतं. जे पहिल्यांदाच घर घेत आहेत त्यांच्यासाठी हे संपूर्ण नवीन होम लोन प्रॉडक्ट उपयोगी आहे. ह्या किफायतशीर हाउसिंग फायनान्समुळे मालकीचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. संभव होम लोनसाठी तुमचं उत्पन्न दर महिना फक्त रु. 10,000 पासून सुरु व्हायला हवं. मग तुम्हाला कमीत कमी रु.10 लाख कर्ज मिळेल. किफायतशीर उत्पन्नाची अट, विविध उत्पन्न असलेल्या गटातील संभाव्य कर्जदारांना कर्जाची सुविधा पुरवते.
उत्पादन, व्यापार आणि अनौपचारिक नोकरी क्षेत्र यासारख्या विविध प्रकारच्या रोजगाराच्या श्रेणीतील पगारदार आणि स्वयंरोजगार असलेले दोन्ही अर्जदार या प्रॉडक्टचा भाग म्हणून कर्जासाठी पात्र आहेत. त्यानंतर, अशा सर्व प्रकारच्या रोजगारासाठी संभव होम लोन्ससाठी पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया लवचिक ठेवण्यात आली आहे.
किमान पात्रता आवश्यकतांव्यतिरिक्त, संभव होम लोन अनेक फायदे देतं. कर्जदारांना परवडणाऱ्या ईएमआय सह आकर्षक व्याजदर आणि 20 वर्षांपर्यंतचा परतफेड कालावधी निवडण्याचा पर्याय मिळतो. पात्र कर्जदारांना मोठ्या कर्जाच्या रकमेचा फायदा होतो, ज्यामुळे घराची मालकी अधिक सोयीस्कर बनते.
संभव होम लोन्स लाँच केल्यामुळे, बजाज हाऊसिंग फायनान्स आता सर्व ग्राहक श्रेणींचा समावेश करून, हाऊसिंग फायनान्समध्ये ऑफरचा संपूर्ण संच सादर करते. 6,000 हून अधिक मंजूर प्रकल्पांसह, कर्जदाता भारतभर कस्टम मॉर्टगेज सोल्युशन्स देतो. इच्छुक अर्जदार कर्जदात्याच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात किंवा त्याच्या कोणत्याही शाखेत जाऊ शकतात.
* पगाराचे नियम आणि किमान कर्जाची रक्कम शहराच्या आधारे बदलण्याच्या अधीन आहे | नियम आणि अटी लागू.
