पुण्यातील तंत्रज्ञानात्मक प्रतिभेची नवीन लाट: मसाई स्कूलच्या नवोन्मेष्कारी पीएपी मॉडेलचा प्रभाव
पुणे : मसाई स्कूल या कौशल्य व संधी यांमध्ये दुवा साधून देणाऱ्या प्लॅटफॉर्मला भारतभरातील ५०००हून विद्यार्थ्यांची स्वप्ने साध्य करून देण्यात यश मिळाले आहे. निष्पत्तीवर आधारित करिअर इन्स्टिट्यूट म्हणून काम करणाऱ्या मसाई स्कूलने १००हून अधिक बॅचेसना प्रशिक्षण दिले आहे आणि ६,००० नवीन नोंदण्यांसह आपली व्याप्ती गेल्या अनेक वर्षांत वाढवली आहे. या महिन्यात पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या या कंपनीने शिक्षण व्यवस्था निष्पत्ती केंद्र करून भारतातील मनुष्यबळातील संभाव्यता खुल्या करण्याचे आपले एकमेव उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
महाराष्ट्रातील पुणे येथील योगेश जगताप या स्वत:च्या आवडीला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तीने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले पण आपल्या नोकरीबाबत समाधानी नसल्यामुळे ते करिअरच्या एका नवीन मार्गाच्या शोधात होते. नवीन संधीच्या शोधात त्यांनी मसाई स्कूलचा पर्याय अवलंबला. मसाई स्कूलसोबतच्या प्रवासाबाबत मत व्यक्त करताना ते म्हणाले, “सिद्धांतात्मक ज्ञान पुरवण्यासोबतच मसाईने माझा आत्मविश्वास वाढवला आणि मला रोजगाराच्या बाजारपेठेसाठी सज्ज केले. या प्रवासात माझी इंग्रजी संवाद कौशल्ये सुधारली आणि जटील डेटा स्ट्रक्चर्स समजणे मला अधिक सोपे वाटू लागले. एक मेकॅनिकल इंजिनीअर असणे आणि बॅकएण्ड डेव्हलपर होणे यातील अंतर भरून काढण्यात मसाईने खरोखर मला मदत केली.” पदवी संपादन केल्यानंतर योगेश यांना अॅब्सोल्युटस्क्रिप्टमध्ये बॅकएण्ड डेव्हलपर म्हणून नोकरी मिळाली.
महाराष्ट्रातील पुणे शहरातील हर्षदा रौंदाळ याही स्वत:च्या मनाला आवडणारे काम करण्यासाठी प्रेरित होत्या. डेटा अॅनालिसिसमध्ये उत्तम कामगिरी करूनही नोकरीत त्या समाधानी नव्हत्या. त्यांच्या काम करण्याच्या आवडीला या नोकरीत न्याय मिळत नव्हता. मसाईसोबतचा प्रवास सांगताना त्या म्हणाल्या, “कम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्या आवडीचे काम करण्यासाठी मी उत्सुक होते. मात्र, माझ्या शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात नेमके कोविड साथीचे संकट आले. त्यामुळे संधी धूसर झाल्या आणि नवीन संपर्कांवर मर्यादा आल्या. हातात चांगली नोकरी असतानाही मी नवीन संधीचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आणि मसाई स्कूलमध्ये नोंदणी केली. पुनरावृत्तीसारख्या कठीण आव्हानांवर मात करतानाच माझी काही ठिकाणी पिछेहाटही झाली, मला सेमिस्टर पुन्हा करावे लागले. अर्थात त्यामुळे माझा निर्धार अधिक पक्का झाला. कितीही समस्या आल्या तरी माझ्या मेंटॉर इशा कटारिया यांनी मोलाचे सहाय्य केले आणि त्यामुळे मला इंडिव्हमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरी प्राप्त करण्यात मदत झाली.”
मसाई स्कूलचे आणखी एक पदवीधर, महाराष्ट्रातील पुण्याचे ओंकार हनुमंत पासलकर यांनी पहिल्यापासून मराठी माध्यमात शिक्षण घेतले होते. त्यामुळे शैक्षणिक कामगिरी उत्तम असूनही त्यांना नोकरी मिळवण्यात अनेक अडचणी येत होत्या. तांत्रिक ज्ञान, इंग्रजीचे ज्ञान आणि सॉफ्ट स्किल्स शिकण्यासाठी त्यांनी मसाई स्कूलचा पर्याय निवडला. तेथील अनुभव व्यक्त करताना ते म्हणाले, “पुण्यातून इलेक्ट्रॉनिक टेलीकम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर माझ्यापुढे अनेक समस्या होत्या. नोकरी न मिळणे आणि शैक्षणिक कर्ज या त्यापैकीच काही समस्या. पण मी मसाई स्कूलमध्ये आलो आणि चित्र पालटून गेले. त्यांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि आक्रमक बूटकॅम्प वातावरणामुळे माझे रूपांतर नोकरीसाठी सज्ज व्यावसायिकामध्ये झाले. अपवादात्मक दर्जाची प्रकल्प सादरीकरणे आणि तपशीलवार तांत्रिक प्रतिसाद यामुळे मला पाइन लॅब्जमध्ये एसडीईवन म्हणून नोकरी मिळू शकली.” आता तंत्रज्ञानात्मक उद्योगात जोमाने काम करणाऱ्या ओंकार यांच्यापुढे कर्ज चुकते करण्याचे तसेच करिअरमध्ये उत्तम कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे. योग्य प्रशिक्षण व निर्धार असेल तर कोणीही आपल्यातील क्षमता नव्याने घडवू शकतो हेच यातून दिसून येते.
प्रखर प्रशिक्षण व प्रभावी मार्गदर्शनासोबतच मसाई स्कूलकडे ४५००हून अधिक हायरिंग पार्टनर्स आहेत. त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना अखंडपणे इच्छित करिअर्समध्ये स्थित्यंतर करण्याची संधी प्राप्त होत राहते. हायरिंग पार्टनर्सच्या या विस्तृत जाळ्यामुळे पदवीधारकांची रोजगारक्षमता वाढते, प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना रोजगाराच्या बाजारपेठेत स्पर्धात्मकरित्या स्थान मिळवण्यात मदत होते.
मसाई स्कूलचे सीईओ व सहसंस्थापक प्रतीक शुक्ला मसाई स्कूलबाबत म्हणाले, “विद्यार्थ्यांची कौशल्ये अधिक निपुण करणारा तसेच त्यांच्यातील संभाव्यता खुल्या करणारा प्लॅटफॉर्म खात्रीशीर निष्पत्तीसह देण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. आम्ही नवीन योजना आणण्यासाठी तसेच प्रस्थापित फर्म्ससोबत सहयोग करून टीम्सचा विस्तार करण्यासाठी समर्पितपणे काम करत आहोत आणि त्यायोगे विद्यार्थ्यांसाठी संधी वाढवत आहोत. शैक्षणिक परिसंस्थेचा प्रगतीशीलरित्या कायापालट करण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे.”
उद्योगक्षेत्रातील प्रमुख फर्म्ससोबत काम करत राहिल्यामुळे मसाई स्कूलने तीन आयआयटी फर्म्ससोबत सहयोग करार केले आहेत. आयआयटी गुवाहाटी, आयआयटी मंडी आणि आयआयटी रोपर तसेच राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) यांच्यासोबत कंपनीचे करार आहेत. त्यामुळे अडथळे दूर होत आहेत आणि शक्यतांच्या मर्यादा विस्तारल्या जात आहेत.
