Sunday, June 7, 2026
BusinessLatest NewsPUNE

जनता सहकारी बँक लि., पुणे,ची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न 

पुणे : जनता सहकारी बँक लि., पुणे, आपल्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून या अमृत महोत्सवी वर्षातील ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.१८/०६/२०२४ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक सभागृह येथे उत्साहात पार पडली. या वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांची विक्रमी उपस्थिती होती. बँकेच्या इतिहासात प्रथमच ९०० पेक्षा जास्त सभासदांनी उपस्थिती नोंदविली.
अमृत महोत्सवी वर्षात बँकेने व्यावसायिक उलाढालींचा रु.१५,०००/- कोटींचा टप्पा पार केला आहे.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात नियोजनबद्ध कामगिरी करून बँकेने सर्व महत्वाच्या आर्थिक निकषांमध्ये उत्साहवर्धक कामगिरी केल्यामुळे रु.४९.०९ कोटींचा निव्वळ नफा प्राप्त झाला. गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये रु.४०.९६ कोटींची वाढ नोंदविली आहे. त्यामुळे  बँकेचा आर्थिक पाया अधिक भक्कम  झाला आहे.

बँकेच्या आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील कामगिरीचे वैशिष्ठ सांगायचे झाल्यास, अहवाल वर्षामध्ये बँकेने आतापर्यंत निर्लेखित केलेल्या, थकीत कर्जामध्ये परिश्रमपूर्वक कामगिरी करून १६९ निर्लेखित कर्ज खात्यातून रु.१७.२० कोटी व अनुप्तादित गुंतवणूकीमध्ये रु.१.०६ कोटींची रोख वसुली करण्यात यश मिळविले आहे.

सन २००६ ते २०२४ या कालावधीमध्ये बँकेने Prudential Balance Sheet Cleansing अंतर्गत रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी घालून दिलेल्या नियमानुसार मार्च २०२४ पर्यंत २,८७२ खाती व रु.५८५.६६ कोटींची अनुत्पादित कर्जे वसुलीचा कायदेशीर हक्क अबाधीत ठेऊन निरस्त केली आहेत अशा निर्लेखित खात्यांमध्ये मार्च २०२४ पर्यंत ७६८ खाती बंद झाली आहेत व त्यामध्ये एकत्रित (पूर्ण व अंशतः) रु.१३६.८३ कोटी वसुली झाली आहे. बँकिंग Industry मधील ही उल्लेखनीय वसुली आहे. मार्च २०२४ अखेर २,१०४ निर्लेखित खात्यांमध्ये ४४८.८३ कोटी येणे बाकी आहे.

निर्लेखित खात्यांमधील वसुलीचे ताळेबंदसाठी असलेले महत्त्व विचारात घेऊन बँकेने निर्लेखित कर्जाच्या वसुलीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला असून उपलब्ध सर्व प्रकारची कायदेशीर आयुधे वापरून, निर्लेखित कर्जांच्या वसुलीचे नियोजनबध्द प्रयत्न सुरु आहेत. आगामी वर्षासाठी बँकेने निर्लेखित खात्यांमध्ये महत्वाकांक्षी वसुली उद्दिष्ट ठेवले आहे.

सन २०२४-२५ मध्ये विविध कायदेशीर उपायांचा व कारवाईचा अवलंब करून निर्लेखित केलेल्या तसेच अन्य अनुत्पादित कर्ज खात्यांमध्ये वसुलीचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.

जनता बँक ही कायमच सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. समाजातील असंघटित वर्गाला सामाजिक सुरक्षा मिळावी या दृष्टीने सरकारने आणलेल्या अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून बँकेने जास्तीत जास्त खाती उघडली आहेत. त्याबद्दल केंद्र सरकारच्या पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अॅथोरीटी (PFRDA) यांनी बँकेला “Award of Excellence Leadership” या बहुमानाने गौरवले आहे. त्याच बरोबर बँकेला भारतातील नामांकित Credit Information Bureau of India Ltd (CIBIL) या क्रेडीट ब्युरोने Best Data Quality Index या पुरस्काराने गौरविले आहे. या पुरस्कारांचे स्वरूप विचारात घेता देशातील अग्रगण्य संस्थांनी बँकेची सामाजिक बांधिलकी व संस्था संचालनावरील उमटविलेली मोहोर आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

या आश्वासक पार्श्वभूमीवर बँकेने सन २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी महत्वाकांक्षी व्यावसायिक उदिष्ट समोर ठेवली आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित असलेल्या सभासदांनी बँकेच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading