मनोज जरांगे पाटील पुन्हा सलाईनवर
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी काही दिवसांपूर्वी आमरण उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले; असून त्यांना सलाईन लावण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेले आंदोलन काही दिवसांपूर्वी मागे घेतले असले; तरी ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांनी पुकारलेल्या आंदोलना वरून गेल्या 10 दिवासाम पासून जरांगे पाटील सध्या चर्चेत आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर काल ते बीडच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागण्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आता त्यांना सलाईन लावण्यात आले आहे.
