अजितदादा आणि वंचित एकत्र येणार? अमोल मिटकारींच्या व्यक्तव्याने नव्या समिकरणाची नांदी
मुंबई : महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे अजित दादांनी महायुतीतून बाहेर पडावे. तसेच बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत गेल्यास आनंदच होईल, असे वक्तव्य केले आहे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकारींच्या व्यक्तव्याने अजितदादा आणि वंचित एकत्र येणार? तसेच ही महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समिकरणाची नांदी आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
महायुतीत आजीतदादांचे खच्चीकरण
अमोल मिटकरी म्हणाले, महायुतीत आजीतदादांचे खच्चीकरण सुरू आहे. यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करीत असल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. तसेच काहीही करून त्यांनी महायुतीत सोडावी. व नवी वाट धरावी असे माझे मत आहे.
अजित पवारांनी वंचित सोबत जावे
अमोल मिटकरी पुढे म्हणाले, अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवून शकतील अशी मला आशा आहे. अजित पवार-प्रकाश आंबेडकर एकत्र यावे, असं कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे.
