Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

आदित्‍य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने साजरा केला आंतरराष्‍ट्रीय योग दिन आणि आरोग्‍य केअर हेल्‍थ कार्ड केले लाँच


पुणे  – आदित्‍य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने शारीरिक, मानसिक व किडनी आरोग्‍यावर लक्ष केंद्रित करत प्रेरणादायी आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा केला. यावेळी सहभागींमध्‍ये आरोग्‍याबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍यात आला.

इव्‍हेण्‍टमध्‍ये श्रीमती वसुधा दवणे यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत सामुदायिक योग सत्राचे आयोजन करण्‍यात आले, तसेच एमपॉवरमधील सीनियर सायकोलॉजिस्‍ट श्रीमती भक्‍ती घाटे यांनी ‘मानसिक आरोग्‍य’ या विषयावर भाषण केले. निवासी कल्‍याणकारी संघटना, ज्‍येष्‍ठ नागरिक गट आणि महिला संघटनांचे सहभागी या इव्‍हेण्‍टमध्‍ये सामील झाले. तसेच जवळपास २०० समुदाय सदस्‍य उपस्थित होते, ज्‍यांनी आरोग्‍य आणि एबीएमएच सेवांबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍याप्रती इव्‍हेण्‍टच्‍या यशामध्‍ये योगदान दिले.
याप्रसंगी, आदित्‍य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने आरोग्‍य केअर हेल्‍थ कार्डच्‍या लाँचची घोषणा देखील केली. या नाविन्‍यपूर्ण उपक्रमाचा कार्डधारकांना विशेष सूट व फायदे देत सामुदायिक आरोग्‍य आणि स्‍वास्‍थ्‍य उत्तम राखण्‍याचा मनसुबा आहे. आरोग्‍य केअर हेल्‍थ कार्ड विशेष दरांमध्‍ये हेल्‍थकेअर सेवांची सर्वसमावेशक श्रेणी देतो, ज्‍यामुळे समुदायाला दर्जेदार आरोग्‍यसेवा अधिक प्रमाणात उपलब्‍ध होतात. प्रत्‍येक कार्डमध्‍ये कुटुंबामधील तीन सदस्‍यांचा समावेश करता येऊ शकतो, ज्‍यामधून सर्वसमावेशक कव्‍हरेज आणि विविध वैद्यकीय सेवा, उपचार व सल्‍लामलतीसाठी मोठ्या प्रमाणात बचतींची खात्री मिळू शकते. या उपक्रमाचा हॉस्पिटल आणि ते सेवा देत असलेल्‍या समुदायामध्‍ये प्रबळ संबंधाला चालना देण्‍याचा मनसुबा आहे.

आदित्‍य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पामेश गुप्‍ता या लाँचबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ”आम्‍ही समुदायाचे आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍य सुधारण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. आजच्‍या इव्‍हेण्‍टला मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादामधून लोकांमध्‍ये आरोग्‍यविषयक समस्‍यांबाबत वाढती जागरूकता दिसून येते. आरोग्‍य केअर हेल्‍‍थ कार्ड आरोग्‍यसेवा अधिक किफायतशीर व उपलब्‍ध होण्‍याजोगी करण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल आहे. आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्त हे कार्ड लाँच करत आम्‍ही प्रतिबंधात्‍मक आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍याच्‍या महत्त्वाला प्राधान्‍य देत आहोत.”
आरोग्‍य केअर हेल्‍थ कार्ड आणि त्‍याच्‍या फायद्यांबाबत अधिक माहितीसाठी समुदायातील सदस्‍यांना आदित्‍य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलला 9881123006 या क्रमांकावर संपर्क साधण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading