Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

महाराष्ट्रातील ५९ सामाजिक संस्थांमध्ये योग यज्ञ २०२४

पुणे : महा एनजीओ फेडरेशन आणि भाजप सेवा प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या ५९ सामाजिक संस्थांमध्ये योग यज्ञ करण्यात आला. यामध्ये सामाजिक संस्थेतील सर्व प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राज्यभर राबविण्यात आला. योगाच्या माध्यमातून समाजात शारीरिक आरोग्य आणि सुसंवाद निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. महा एनजीओ फेडरेशनचे संचालक योगेश बजाज आणि वरिष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

शेखर मुंदडा म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशा पैकी १७५ देशांच्या सह प्रतिनिधींनी ह्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता आणि सदर प्रस्ताव मंजूर ही झाला होता. त्यानंतर २१ जून २०१४ पासून महा एनजीओ फेडरेशन जागतिक योग दिन साजरा करीत आहे

कार्यक्रमाद्वारे योगाचे महत्त्व आणि फायदे जन सामान्या पर्यंत पोहोचवण्याचा आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने समाजातील विविध घटकांपर्यंत संदेश पोहोचविण्यात आला. योग यज्ञाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवकांनी आपले योगदान दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading