Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’; शिंदे गटात प्रवेश

मुंबई:  शिवसेनेचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करून शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटात आपले म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंदडा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय नहाटा, हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, उपजिल्हाप्रमुख राजू चापके आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मुंदडा यांचा हिंगोलीत मोठा प्रभाव आहे. चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या मुंदडा यांनी सहकार राज्य मंत्रिपद देखील भूषविले आहे. मात्र, मागील काही काळापासून ठाकरे गटात ते नाराज होते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने आपल्याला विश्वासात न घेतल्याचा त्यांचा आक्षेप आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून मुंदडा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading