Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

NDA सरकारच खातेवाटप जाहीर

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर आज खातेवाटप जाहीर झाले आहे. अपेक्षे प्रमाणे मोदी सरकारमध्ये मागील टर्ममध्ये जे मंत्री होते त्यांना तीच खाती देण्यात आली आहेत. नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण, निर्मला सितारामण यांना अर्थ मंत्रालय आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.

दरम्यान काल (दि. 9 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यातील काही जणांचे खातेवाटप आज जाहीर झाले आहे. त्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा सहभाग आहे.

असं आहे खाते वाटप

अमित शाह – गृहमंत्री

राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री

एस. जयशंकर – परराष्ट्र मंत्री

नितीन गडकरी – रस्ते आणि परिवहन मंत्री

अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्रालय

जतीन राम – सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME)

शोभा करंडजले – राज्यमंत्री एमएसएमई

निर्मला सीतारमन – वित्त मंत्रालय

शिवराज सिंह चौहान – कृषि मंत्रालय

पियुष गोयल -वाणिज्य

अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालय

भूपेंदर यादव – पर्यावरण

राम मोहन नायडू- नागरी उड्डाण मंत्रालय

जेपी नड्डा- आरोग्य मंत्रालय

सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय

सी आर पाटील- जलशक्ती

किरण रिजीजू- संसदीय कार्यमंत्री

धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री

राज्यमंत्री

श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा, राज्यमंत्री

शोभा करंदाजे – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, राज्यमंत्री

शांतनु ठाकुर – पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री

मुरलीधर मोहोळ –  नागरी उड्डाण, राज्यमंत्री

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading