पीएमपीएमएल कडून सहा बसमार्गांचा विस्तार
पुणे : पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.) कडून प्रवाशांच्या मागणीनुसार सहा बसमार्गांचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये बसमार्ग क्र. बी .१ – दिघी ते भोसरी या मार्गाचा विस्तार पिंपरी मेट्रो स्टेशन पर्यंत., बसमार्ग क्र. १७ – नऱ्हेगाव ते स्वारगेट या मार्गाचा विस्तार सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन पर्यंत, बसमार्ग क्र. ११८ – स्वारगेट ते नांदेडगाव या मार्गाचा विस्तार बागेश्री सोसायटी पर्यंत., बसमार्ग क्र. १९० – हडपसर ते वडकीगाव या मार्गाचा विस्तार मस्तानी तलावा पर्यंत., बसमार्ग क्र. ३५६- सेक्टर क्र.१२ ते भोसरी या मार्गाचा विस्तार नाशिक फाटा मेट्रो स्टेशन पर्यंत., बसमार्ग क्र. ३७५ – इंटरनिटी कंपनी (हिंजवडी) ते शिवाजी चौक या मार्गाचा विस्तार मुकाई चौक पर्यंत असे बसमार्ग वाढवण्यात आले आहे. या बससेवेचा लाभ प्रवाशी नागरीक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरीक व रूग्ण यांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
बसमार्गांचा तपशील खालीलप्रमाणे –
बसमार्ग क्र. बी .१ – दिघी ते पिंपरी मेट्रो स्टेशन.
मार्गे – भोसरी, लांडेवाडी, एम.आय.डी.सी., पिंपरी डेपो.
बस संख्या – १.
वारंवारिता – १ तास ३० मिनिटे.
बसमार्ग क्र. १७ – नऱ्हेगाव ते सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन.
मार्गे – सिंहगड रोड, स्वारगेट, शनिपार चौक, अ.ब.चौक, पुणे म.न.पा.
बस संख्या – ९.
वारंवारिता – २० मिनिटे.
बसमार्ग क्र. ११८ – स्वारगेट ते बागेश्री सोसायटी (नांदेडगाव).
मार्गे – सिंहगड रोड, आनंदनगर, नांदेडफाटा, नांदेडगाव.
बस संख्या – १.
वारंवारिता – २ तास.
बसमार्ग क्र. १९० – हडपसर ते मस्तानी तलाव (वडकी).
मार्गे – शेवाळेवस्ती, गायकवाडवस्ती, तळेवडी.
बस संख्या – २.
वारंवारिता – १ तास ३० मिनिटे.
बसमार्ग क्र. ३५६- सेक्टर क्र.१२ ते नाशिक फाटा मेट्रो स्टेशन.
मार्गे – इंद्रायणीनगर, भोसरी, लांडेवाडी.
बस संख्या – १.
वारंवारिता – १ तास ४५ मिनिटे.
मार्ग क्रमांक ३७५ – मुकाई चौक ते इंटरनिटी कंपनी (हिंजवडी).
मार्गे – रावेत, समीर लॉन्स, पुनावळे, कोलते-पाटील टाउनशिप.
बस संख्या – २.
वारंवारिता – १ तास १५ मिनिटे.
