पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ होणार मंत्री
नवी दिल्ली : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी!!! पुण्याचे भाजप महायुतीचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची देशाच्या NDA सरकारमध्ये वर्णी लागली आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांना पंतप्रधान कार्यालयातून यासंदर्भात दूरध्वनीवरून सुचित करण्यात आलेले आहे. पहिल्यांदाच पुण्यातून खासदार झालेले मोहोळ यांना भाजपकडून तरुण चेहरा म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला याचा फायदा होईल अशी चर्चा आहे. भाजपा सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असणारे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे पुणे शहर भाजपा मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
