Sunday, June 7, 2026
Latest NewsLIFESTYLE

येत्या १२ जून पासून ‘ग्रीष्म’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन

पुणे  : ग्रीष्म ऋतूमधील फुलांचा बहर, रंगीबेरंगी लँडस्केप्स आणि डोळ्यांना सुखावणारी अनेकविध ठिकाणांची चित्रे पाहण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे चित्रकार विवेक दहिवले यांच्या ‘ग्रीष्म’ या एकल चित्रप्रदर्शनीचे.

येत्या बुधवार दि १२ जून ते रविवार दि १६ जून दरम्यान घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात सकाळी ११ ते सायं ७ दरम्यान ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आली असून ती सर्वांसाठी विनामूल्य खुली असणार आहे.

बुधवार दि १२ जून रोजी सायं ५.३० वाजता सुप्रसिद्ध मूर्तीशास्त्रज्ञ डॉ गो. बं. देगलूरकर आणि ख्यातनाम चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन होणार असून त्यानंतर ती रसिकांसाठी खुली होईल, अशी माहिती आयोजकांनी कळविली आहे.

चित्रकार विवेक दहिवले हे आश्वासक युवा चित्रकार असून त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचा बेस्ट पोट्रेटसाठीचा व्ही ए माळी पुरस्कार देखील मिळाला आहे. ग्रीष्म या प्रदर्शनीमध्ये असलेली सर्व चित्रे ही जलरंग प्रकारातील असून ग्रीष्म ऋतूची अनुभूती प्रेक्षक अनुभवू शकतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading