Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

जेईई ॲडव्हान्स निकाल: बाकलीवाल ट्युटोरीयल्सच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

पुणे : ‘आयआयटी’ आणि एनआयटीसह विविध केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला असून बाकलीवाल ट्युटोरीयल्सच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये घवघवीत यश मिळवले आहे. बाकलीवाल ट्युटोरीयल्सच्या काशवी खुराणा आणि श्रीधर पाटील या दोन्ही विद्यार्थ्यांनी या निकालात जास्त गुण मिळवत आकाशाला गवसणी घातली. या निकालात काशवीला संपूर्ण भारतामध्ये ३९ वा क्रमांक मिळाला असून ती महाराष्ट्रातील टॉपर मुलींमध्ये आली आहे.

बाकलीवाल ट्युटोरीयल्सच्या १२ विद्यार्थ्यांनी ५०० च्या खाली संपूर्ण भारतात रँक मिळवला आहे. ही संख्या पुण्यातील इतर सर्व संस्थांपेक्षा जास्त आहे. २००० मध्ये ३२ विद्यार्थ्यांनी तर ५००० मध्ये ८९ विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया रँक मिळवला. बाकलीवाल ट्युटोरीयल्सच्या ३०३ हून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स २०२४ ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता ते प्रतिष्ठित आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यास पात्र झाले आहेत.

काशवी खुराणा म्हणाली की, “जेईई ॲडव्हान्समध्ये मला मिळालेल्या रँकमुळे मी खूप आनंदी आहे. मला जेईई मेन रँक मिळाल्यानंतर, माझ्या शिक्षकांनी मला प्रेरित केले आणि मला टॉप रँक मिळवण्यासाठी दररोज एक मॉक पेपरचा सराव करण्यास सुचवले त्यामुळेच माझी प्रगती झाली. बाकलीवाल ट्यूटोरियल्सचे शिक्षक, माझे पालक आणि माझ्या संपूर्ण तयारीच्या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार यावेळी काशवीने व्यक्त केले.

श्रीधर पाटील म्हणाला की, “शिक्षकांचा पाठिंबा आणि पालकांचे सततचे प्रोत्साहन यामुळेच मला हे यश शक्य झाले. चाचण्यांचे प्रकार, वेळेवर शंकानिवारण आणि अत्यंत मार्गदर्शक प्रशिक्षणामुळे मी जेईई ॲडव्हान्समध्ये मिळवलेल्या या रँकचा मार्ग मोकळा झाला.”

बाकलीवाल ट्यूटोरियल्सचे संचालक वैभव बाकलीवाल म्हणाले की, आमच्या ३०३ हून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स परीक्षा मोठ्या फरकाने उत्तीर्ण केली आहे आणि हा निकाल आमच्यासाठी खूप आनंददायी आहे. महाराष्ट्रातील टॉपर मुलींमध्ये ५०० पैकी १२ विद्यार्थिनी ह्या बाकलीवाल ट्यूटोरियल्समध्ये शिकत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. पुण्यातील इतर खाजगी संस्थांपेक्षा हे यश जास्त आहे. बाकलीवाल ट्यूटोरियल्सच्या मेहनत, सातत्यपूर्ण प्रामाणिक आणि पारदर्शक परिश्रमामुळे २००९ पासून सातत्याने असे निकाल मिळत आहेत. फक्त जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये बाकलीवाल ट्यूटोरियल्स गेल्या १४ वर्षात “पुणे रँक १” तब्बल 10 वेळा आणि “महाराष्ट्र रँक १” तब्बल ५ वेळा मिळवला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading