माध्यम सम्राट, चित्रपट निर्माते आणि रामोजी फिल्म सिटीचे मालक रामोजी राव यांचे निधन
हैद्राबाद : माध्यम सम्राट, चित्रपट निर्माते आणि रामोजी फिल्म सिटीचे मालक रामोजी राव यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
रामोजी ग्रूपचे संस्थापक रामोजी राव यांचे आज ८ जून रोजी निधन झाले आहे. रामोजी राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यामुळे त्यांना ५ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज सकाळी त्यांनी सकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोक पसरला आहे.
रामोजी राव यांचे खरे नाव चेरुकुरी रामोजी राव असे होते. १६ नोव्हेंबर १९३६ साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात रामोजी राव यांचा जन्म झाला. प्रचंड मेहनत घेत रामोजी राव यांनी बिझनेस उभा केला होता. तसेच त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी जगभरातील सर्वात मोठा फिल्म स्टुडीओ रामोजी फिल्म सिटी, ईटीवी नेटवर्क, डॉल्फिन हॉटेल्स, मार्गदर्शी चिटफंड आणि ईनाडू हा तेलुगु पेपर सुरु केला होता.
