Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

शिववंदना कार्यकर्त्यांचा सन्मान करीत व स्वराज्य गुढी उभारून शिवराज्यभिषेक दिन केला साजरा

पुणे : जय गणेश व्यासपीठ व शिवजयंती महोत्सव समिति पुणे ह्यांचा प्रेरणेने नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट नवी खडकी येरवडा येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला.
भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवरायांचा जिरेटोप ,सुवर्ण होन ,जगदंब तलवार ,वाघनखे ,शिवमुद्रा या पंच स्वराज्य चिन्हांनी अलंकृत स्वराज्य गुढी उभारण्यात आली.
तसेच येरवडा परिसरात ठिकठिकाणी नियमितपणे शिववंदना सेवा देत छत्रपति शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या ३० शिव कार्यकर्त्यांचा मंडळातर्फे शाल व छत्रपति शिवरायां वर आधारित पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.
ह्या सन्माना बाबत शिव कार्यकर्त्यांनी मंडळाचे आभार मानले व शिव विचारांचा प्रसार अजून जोमाने करीत राहू अशी ग्वाही दिली.
वस्ती परिसरातील जेष्ठ नागरिकांचा हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन पूजन करण्यात आले. मंडळाचे कार्यकर्ते व नागरिकांनी शिवरायांचा जयजयकार करीत कार्यक्रम उत्साहात पार पाडला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading