fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsSports

महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेतील ‘पुणेरी बाप्पा’ संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण 

पुणे : महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेच्या दुसर्‍या मौसमासाठी ‘पुणेरी बाप्पा’ संघाची तयारी जय्यत सुरू असून ‘पुणेरी बाप्पा’ संघाची घोषणा आणि संघाच्या नवीन जर्सीचे अनावरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. स्वतःवरचा आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हा युवा खेळाडूंसाठी यशाचा खरा मार्ग असल्याचे मत भारतीय खेळाड, महाराष्ट्र रणजीपटू, ‘आयपीएल’मधील चैन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार आणि ‘पुणेरी बाप्पा’ संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांने व्यक्त केले.

यावेळी स्पोटर्स अ‍ॅथोरीटी ऑफ इंडिया (‘साई’) चे सरसंचालक संदीप प्रधान, सुहानाचे विशाल चोरडीया, विश्व चोरडीया आणि शिव चोरडीया, सह्यांद्री इंडस्ट्रीजचे सत्येन पटेल, मित्तल ब्रदर्सचे सुनिल मित्तल, सुजनीलचे आशिष देसाई हे पुणेरी बाप्पा संघाचे सहसंघमालक, ज्योती होम अप्लायन्सेसचे आशिष आणि सिद्धार्थ देसाई, पीएनजी चे अभय गाडगीळ , बाबूस लक्ष्मीनारायण चिवडा उद्योगाचे प्रशांत दत्ता, निवेदीता आणि धिमन दत्ता, जेष्ठ क्रीडा समीक्षक आणि पत्रकार सुनंदन लेले, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, पुणेरी बाप्पा संघाचे प्रशिक्षक अतुल गायकवाड आणि सर्व खेळाडू, सहाय्यक स्टाफ आणि पुणेरी बाप्पा संघाचे संपूर्ण कुटूंब उपस्थित होते. पुणेरी बाप्पा संघाला रावेतकर बिल्डर्स, पीएनजी एक्सक्लुझिव्ह, बाबूस लक्ष्मीनारायण चिवडा, ज्योती होम अप्लायन्सेस आणि ना-रीअल यांनी यावर्षी सुद्धा पाठिंबा दिला आहे.

कार्यक्रमप्रसंगी बोलताना ऋतुराज गायकवाड म्हणाला की, मी जेव्हा २२-२३ वर्षांचा होतो तेव्हा महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धा पहावयास मी आवर्जुन जायचो आणि या स्पर्धेमध्ये खेळणे, हे माझे स्वप्न होते. परंतु काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. आज महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेमध्ये पुणेरी बाप्पा या संघाचे कर्णधारपद भुषविताना मला खुप आनंद आणि समाधान असून मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो !! स्वतःवरचा आत्मविश्वास कायम ठेऊन अथक परिश्रम केल्यास निश्चितच यशाचा मार्ग सापडतो. मी आजपर्यंत जे काही क्रिकेटचे ज्ञान आत्मसात केले आहे, मला जो अनुभव मिळाला आहे, त्याचा उपयोग मी माझ्या पुणेरी बाप्पाचा संघ आणि सहकार्‍यांसोबत करून स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

सुहाना उद्योगसुमहाचे आणि पुणेरी बाप्पाचे संघाचे सहसंघमालक विशाल चोरडीया म्हणाले की, पुणेरी बाप्पा संघाचे प्रतिनिधीत्व करताना आम्हाला खुप अभिमान असून गतमौसमामध्ये आम्ही खुप काही शिकलो आहे. या दुसर्‍या मौसमासाठी पुणे बाप्पा हा संघ म्हणून आमची सर्वोत्तम तयारी सुरू आहे. आम्ही सर्व संघ-मालक म्हणून पुणे बाप्पाच्या सर्व खेळाडूंच्या पाठीशी भक्कम उभे राहणार असून खेळाडूंना उपयुकक्त अशा सर्व योजना राबविण्यासाठी सदैव तत्पर असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुजनील उद्योग समुहाचे आणि पुणेरी बाप्पाचे संघाचे सहसंघमालक आशिष देसाई म्हणाले की, पुणेरी बाप्पा संघ महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेच्या दुसर्‍या मौसमासाठी सज्ज आहे. आम्हाला पाठींबा देणारे सर्व संघमालक, प्रायोजक आणि संघाचे फॅन यांनी नेहमीच आम्हाला सकारात्मक उर्जा दिली असून त्याव्दारे या मौसमात संघ सर्वोत्तम कामगिरी करेल !! महिला महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धेमध्येसुद्धा ‘पुणेरी बाप्पा’चा संघ असून ही संघासाठी आणखी एक गौरवाची गोष्ट आहे. महिला एमपीएलमध्ये भारतीय खेळाडू, महाराष्ट्रची खेळाडू आणि डब्ल्युएमपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स संघाची कर्णधार स्मृती मानधना ही पुणेरी बाप्पाची कर्णधारपण भुषविणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading