fbpx
Sunday, June 16, 2024
BusinessLatest NewsTECHNOLOGY

अतुलनीय ऑडिओ अनुभव देत विशेषत: भारतासाठी सोनी इंडियातर्फे एक्सएस-162GS आणि एक्सएस-160GS कार स्पीकर्स सादर

नवी दिल्ली : सोनी इंडियाने आज ऑटोमोटिव्ह साउंडच्या क्रांतीत नवीन भर घालत XS-162GS आणि XS-160GS कार स्पीकर्स सादर केले. ज्यांना त्यांच्या फॅक्टरी कार ऑडिओमधून चांगला ऑडिओ अनुभव अपग्रेड करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी तयार केलेला  नवीन GS लाइन-अप त्याच्या बारीक ट्यून केलेल्या ध्वनीशास्त्रासह एका परिवर्तनीय, चांगल्या  प्रवासाचे आश्वासन देतो. XS-162GS 16 सेमी (6½”) टू वे कॉम्पोनंट स्पीकर्स सादर करतो तर XS-160GS 16 सेमी (6½”) टू वे कोएक्सियल स्पीकर्स सादर करतो. अचूकतेने तयार केलेल्या या  स्पीकर्समध्ये चांगल्या बाससाठी कंपोझिट पॉलीप्रॉपिलीन कोन वूफर, रिस्पॉन्सिव्ह नोट्ससाठी बाजूने फोम रबर आणि नैसर्गिक ध्वनी प्रसारासाठी सिल्क सॉफ्ट डोम ट्वीटर यांसारखी  वैशिष्ट्ये आहेत. शाश्वततेबाबत असलेली सोनी इंडियाची बांधिलकी पर्यावरणासंबंधी जागरूक असलेले पॅकेजिंग आणि कमी झालेल्या शाईच्या वापरातून दिसून येते. पर्यावरणीय जबाबदारीबद्दलचे त्यांचे समर्पण यातून प्रतिबिंबित होते.

XS-162GS आणि XS-160GS कार स्पीकर्स खास भारतासाठी आणि भारतीय बाजारपेठेतील प्राधान्ये आणि गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत. 350W च्या पीक पॉवरसह आणि 60W च्या RMS सह दोन्ही मॉडेल्स स्पष्ट आवाजातील सादरीकरणासह उंचावलेली स्पष्टता आणि शक्तिशाली ऑडिओ आउटपुट देतात.

XS-162GS आणि XS-160GS स्पीकर्सची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • कंपोझिट पॉलीप्रॉपिलीन कोन वूफर: चांगल्या प्रकारे डिझाइन केलेले पॉलीप्रॉपिलीन डायफ्राम सखोल बास देते तर मिड आणि हाय फ्रिक्वेंसीमध्ये टि्वटरसह एकत्र येत चढ उतार टाळते
  • फोम रबर सराउंड: वूफर सराउंड मटेरियल फोम रबरपासून बनवलेले असते. हवेने भरलेल्या मॅट्रिक्स स्ट्रक्चरसह तयार केले जाते. ते वजनाने हलके आणि टिकाऊ असते, रिस्पॉन्सिव्ह बास नोट्ससाठी इष्टतम डॅम्पिंग वैशिष्ट्ये सादर करते.
  • सिल्क सॉफ्ट डोम ट्वीटर: आमच्या प्रीमियम स्पीकर डिझाइनसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित सॉफ्ट डोम ट्वीटरमध्ये फ्लॅट फ्रिक्वेंसी प्रतिसाद आणि विस्तृत डिसपरशन आहे. जोडीला, त्याचे सिल्क डायफ्राम चांगल्या अंतर्गत घटीसह नैसर्गिक आणि शांत आवाज सादर करते.
  • डायनॅमिक एअर डिफ्यूझर: समग्र डायनॅमिक एअर डिफ्यूझर सुरळीत कोन ट्रॅव्हल आणि व्हॉईस कॉइल थंड होण्यासाठी प्रभावी पद्धतीने हवेचे वहन सुनिश्चित करते.
  • प्रोग्रेसिव्ह हाईट रेट स्पायडर: स्पीकर कोनच्या अधिक जलद आणि अचूक कुशनिंगसाठी डिझाइन केलेल्या प्रोफाइलसह, ध्वनिशास्त्रानुसार ऑप्टिमाइझ केलेला स्पायडर उच्च उर्जा हाताळणी आणि हवेच्या प्रवाहाला अनुमती देतो.
  • सुलभ जोडणी: लहान ट्वीटर चासी आणि उथळ वूफर बास्केट फॅक्टरी ग्रिल्ससह भौतिक हस्तक्षेप कमी करतात आणि त्यायोगे विविध प्रकारच्या वाहनांमध्ये सुलभ जोडणी शक्य  होते.
  • फेज प्लग (केवळ XS-162GS): वूफरवरील रेझोनान्स डॅम्पिंग फेज प्लग जुळलेल्या ट्विटर्ससह क्रॉसओव्हर पॉईंटपर्यंत योग्य वारंवारता प्रतिसाद जाणवून घेण्यास मदत करतो.
  • पुरवठा केलेले ट्वीटर माउंट्स/ॲडॉप्टर (केवळ XS-162GS): नवीन डिझाइन केलेले अँगल माउंट्स आणि सरफेस माउंट ॲडॅप्टर्स उत्कृष्ट ध्वनी परिणामांसाठी विविध प्रकारच्या वाहनांमध्ये लवचिक जोडणीची खात्री देतात.
  • इन-लाइन क्रॉसओवर नेटवर्क्स (केवळ XS-162GS): इन-लाइन क्रॉसओव्हर नेटवर्क्स वाहनांच्या विविध प्रकारांमध्ये सुलभ वायरिंग रिअलीझिंग जोडणी सक्षम करतात.

उपलब्धता

नवीन लाइनअप २७ मे २०२४ पासून भारतभरातील निवडक कार डीलर्सकडे उपलब्ध असेल.

मॉडेल

 

सर्वोत्तम खरेदी (रु. मध्ये) उपलब्धता दिनांक

 

XS-162GS रु. १६,९९०/- २७ मे २०२४ पासून पुढे
XS-160GS रु. १२,९९०/- २७ मे २०२४ पासून पुढे

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading