fbpx
Sunday, June 16, 2024
BusinessLatest News

नवीन एकात्मिक सिमेंट केंद्र सुरू करण्यासाठी JSW सिमेंट सुमारे 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार 

मुंबई –  24.25 अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल असलेल्या JSW समूहाचा भाग असलेल्या JSW सिमेंटने राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात ग्रीनफिल्ड, एकात्मिक सिमेंट उत्पादन सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी सुमारे 3,000 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. सिमेंट कारखान्याचे  भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. JSW सिमेंटच्या या नवीन सिमेंट सुविधा केंद्रात 3.30 MTPA पर्यंतचे क्लिंकरायझेशन युनिट, 2.50 MTPA पर्यंतचे ग्राइंडिंग युनिट, तसेच 18 मेगावॅटच्या वेस्ट हीट रिकव्हरी बेस्ड पॉवर प्लांटचा समावेश आहे. तसेच खाणीतून चुनखडी प्रकल्पापर्यंत नेण्यासाठी 7 किमी लांबीचा ओव्हरलँड बेल्ट कन्व्हेयर आणि भट्टीत पर्यायी इंधन वापरण्याची व्यवस्था याची देखील व्यवस्था करून त्यासाठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रस्तावित गुंतवणुकीला इक्विटी तसेच दीर्घकालीन कर्जाच्या समन्वयातून निधी दिला जाईल.

JSW सिमेंटने यासंदर्भातील काही नियामक आणि वैधानिक मंजुरी आधीच मिळवल्या आहेत. तसेच इतर आवश्यक मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे युनिट एकदा कार्यान्वित झाल्यानंतर JSW सिमेंट उत्तर भारतातील आकर्षक सिमेंट बाजारपेठेत प्रवेश करेल. सध्याच्या गुंतवणुकीमुळे 1 हजारांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

JSW सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल म्हणाले की, “आमच्या सिमेंट व्यवसायाद्वारे राजस्थानमध्ये करत असलेली ही आमची सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे. या भागात रोजगाराच्या भरीव संधी निर्माण करून राज्याच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी मी राजस्थान राज्य सरकारसोबत सहयोग  करण्यास उत्सुक आहे. नागौरमध्ये एकात्मिक सिमेंट सुविधा निर्माण करण्यासाठीच्या या प्रस्तावित गुंतवणुकीमुळे JSW सिमेंट पुढील काही वर्षांत संपूर्ण भारतात आपला ठसा उमटवेल. या प्रदेशातील हे नवीन केंद्र आम्हाला उत्तरेकडील राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि NCR प्रदेशातील आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम करेल.

JSW सिमेंटचे CEO नीलेश नार्वेकर म्हणाले, “या गुंतवणुकीमुळे आम्ही उत्तर भारतातील झपाट्याने वाढणाऱ्या आणि आकर्षक सिमेंट मार्केटमध्ये प्रवेश करणार आहोत. या राज्यातील जीडीपी वाढीचा दर सर्वाधिक आहे तसेच येथे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण विकासही झालेला दिसतो. या तेजीत असलेल्या बांधकामासाठी पोषक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहोत तसेच आमच्या ग्राहकांना उच्च दर्जाचे सिमेंट आणि जागतिक दर्जाची ग्राहक सेवा देण्याचे आमचे ध्येय आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading