Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्यात सामंजस्य करार

पुणे  – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्यात मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत विद्यापीठातील वाणिज्य विभागातर्फे कर आणि लेखा व्यावसायिकांना/ अभ्यासकांना प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना असोसिएशनच्या माध्यमातून इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे प्रेसिडेंट सीएमए श्रीपाद बेदरकर, अध्यक्ष श्री. नरेंद्र सोनवणे, उपाध्यक्ष श्री. प्रसाद देशपांडे, सचिव अॅड. अनुरूद्रा चव्हाण, कोषाध्यक्ष श्री. मिलिंद हेंद्रे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ.) विजय खरे, अधिसभा सदस्य श्री. विनायक आंबेकर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. जी. श्यामला, सहाय्यक प्राध्यापक ओम वेर्लेकर, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी झालेल्या या सामंजस्य करारामुळे या क्षेत्रातील अभ्यासकांना योग्य प्रशिक्षण मिळून त्यांचा फायदा होणार असल्याचे असोसिएशनचे प्रेसिडेंट सीएमए श्रीपाद बेदरकर म्हणाले. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष अनुभवावर भर देण्यात आला आहे. या करारामुळे वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांना कर प्रणालीचे अद्ययावत ज्ञान प्राप्त होणार असल्याचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी म्हणाले. या सामंजस्य करारातंर्गत टॅक्सेशन आणि कॉमर्स क्षेत्रातील अभ्यासकांना योग्य ते मार्गदर्शन प्रदान करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना या क्षेत्रातील कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांना कर प्रणालीतील विविध बाबी समजून घेण्यासाठी, त्यांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी असोसिएशन मदत करणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading