Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

राणाजगजितसिंह पाटील यांची आठवडी बाजारात पदयात्रा

धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात थेट लढत होत आहे. यातच अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली. त्यामुळे सध्या धाराशिव मतदारसंघातील राजकीय वातावरणाने दिशा बदलली असल्याचे दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील यांचे पती भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी देखील अर्चना पाटलांच्या आपला जोरदार प्रचार सुरू केला आहे.

अर्चना पाटील यांच्यासाठी राणाजगजितसिंह पाटील यांनी औसा तालुक्यातील उजनी येते आठवडी बाजारात पदयात्रा काढली. यावेळी त्यांनी व्यापारी, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. पाटील यांनी मतदारांना आवाहन करत केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. त्यामुळे निधीचा ओघ आपल्याकडे वळविण्यासाठी निवडून येणारा खासदार हा आपल्या हक्काचा असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच मतदारसंघात विकास कामासाठी निधीचा ओघ आणायचा असेल तर आपल्या हक्काचा खासदार निवडून द्या. तेव्हाच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास हो ऊ शकतो. तेव्हा येत्या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रंचडड मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading