Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

नजरचुकीने खासदार झालेल्यांना आता थारा नाही

आळंदी : गेल्या काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. तर त्यांचा सामना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी होत आहेत. अशातच आता दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार धुमधडक्यात सुरू केला असून एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी करतांना दिसत आहेत. अशातच अजित पवार गटातील आमदार दिलीप मोहिते पाटलांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर आळंदी येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या मेळाव्यात शाब्दिक हल्लाबोल केला आहे. तर नजरचुकीने खासदार झालेल्यांना आता थारा नाही. असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मरकळ- आळंदी येथे संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, माऊलींच्या दर्शनाला जगातले लोक येत असतात. खासदार म्हणून निवडून गेल्यावर तुम्ही माऊलींच्या दर्शनास तरी आले का ? असा सवाल मोहिते पाटलांनी अमोल कोल्हे यांना केला. तसेच लोकांना भेटले नाहीत, प्रश्न सोडवले नाहीत. त्यांचे फोन घेतले नाहीत, तुम्हाला आता मत मागण्याचा नैतिक अधिकार काय ? असा खोचक सवाल देखील मोहिते पाटलांनी केला.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर केंद्रातील खासदार हा आपल्या विचाराचा असायला हवा. तसे झाल्यास आपल्याला आपल्या भागाचा विकास करणे शक्य होणार आहे. आता चाकण-आळंदी परिसराच्या विकास कामांसाठी मोठा निधी मिळविण्यासाठी मोदींना पाठबळ द्यावे. त्यासाठी आढळरावांच्या पाठीमागे सर्वांनी उभे राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सध्याचे विद्यमान खासदार निवडून आले. पम पाच वर्ष मतदारसंघात फिरकले नाहीत. त्यामुळे मतदारसंघात त्यांना थारा नाही. याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. त्यांच्या निषेधाचे फलक अनेक ठिकाणी लावले आहेत. त्यामुळे मतदारसंघात न फिरकल्याने त्यांना आता येथे थारा नसल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading