Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Loksabha Election : रायगडमध्ये होणार मोठा घोळ, तीन ‘अनंत गिते’ निवडणुकीच्या रिंगणात

रायगड : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. तर उर्वरित चार टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात आता आता अर्ज सादर करण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. अशातच रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी मंत्री अनंत गिते यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. मात्र याच वेळी अन्य दोघांनीही अनंत गिते याच उमेदवारी अर्ज सादर केल्याने लोकांमध्ये मोठा घोळ होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

रायगड लोकसभेसाठी येत्या १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. मात्र पहिल्या दिवशी एकाही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला नव्हता. यातच दुसऱ्या दिवशी एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. यातच केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी आज निवडणुक कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. त्यानंतर निवडणुक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्विकारला.

मात्र दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी अनंत पद्मा गिते आणि अनंत बाळोजी गिते यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज सादर केलाय. त्यामुळे रायगडमधून तीन अनंत गिते नावाचे उमेदवार निवडणुक रिंगणात असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. नामसाधर्म्य असलेले उमेदवारांना उभे करून प्रस्थापित नेत्यांची कोंडी करण्याची खेळी विरोधकांनी यावेळेसही खेळली सल्ल्याचे यानिमित्ताने दिसून आले. यातच नितीन जगन्नाथ मयेकर आणि शेकापचे आस्वाद जयदास पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज सादर केलाय.

दरम्यान, 2009 ते 2014 साली रायगड लोकसभा मतदारसंघाचं अनंत गिते यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे यावेळेस अनंत गिते नावाचे तीन व्यक्ती मैदानात असल्याने मतदारांमध्ये मोठा घोळ होण्याची शक्यता आहे. तर याचा किंच्चित तरी फटका अनंत गिते यांना होण्याची आता शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading