Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

वसंताची पाऊलवाट ही कादंबरी विद्यार्थी आणि शिक्षकांनाही प्रेरणादायी – डॉ.श्रीपाल सबनीस


पुणे : वसंताची पाऊलवाट ही जयवंत अवघडे लिखित कादंबरी विद्यार्थी आणि शिक्षकांना अतिशय प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक डॉ .श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले .महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात वसंताची पाऊलवाट या कादंबरीचा प्रकाशन समारंभ पार पडला त्यावेळी ते बोलत होते .यावेळी त्यांनी अवघडे हे ग्रामीण साहित्य ही विपुल प्रमाणात लिहले असून आजही त्यांची लेखणी चालू असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले .
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी आपल्या मनोगतात म्हणाले की .सरांचे असणारे फिजिक्स विषयावरचे सखोल ज्ञान त्या कालावधीत विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरले. त्यातून विद्यार्थी घडत गेले, अशा ज्ञानवंत व ज्ञानसक्त शिक्षकांची समाजाला आवश्यकता आहे. विद्यार्थी घडत जावेत. अशा विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रेरणा मिळत राहील. असे या कादंबरीतून वाटते आहे. तसेच आज ही समाजातील सर्व स्तरातून व विषयातून साहित्य रूपातून लेखन झाले पाहिजे व त्यास समाजाने प्रोत्साहन दिले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली .
या प्रकाशन समारंभास डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त शरद कुंटे ,लेखक जयवंत अवघडे ,संस्कृती प्रकाशनाच्या प्रमुख, सौ सुनीता राजे पवार, मराठवाडा शिक्षण संस्थेचे भाऊसाहेब जाधव, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, डॉ.किशोर भोसले आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते,

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading