Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

गरिबांचे खच्चीकरण करणारी अग्निवीर योजना बंद करणार – राहूल गांधी

भंडारा : अग्निवीर ही योजना आर्मी ने नाही बनवली तर ती भाजप कार्यालयात बनवली गेली आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या, लढणारा प्रत्येक सैनिक हा सैनिक असतो. त्याला पेन्शन किंवा शाहीदचा दर्जा न देणे हा अन्याय आहे. याचा कोणताही फायदा नाही. केवळ गरीब कुटूंबातील मुलांच्या खच्चीकरणांसाठी ही योजना आहे. त्यामुळे सत्तेत आल्यास आम्ही पहिल्यांदा अग्निवीर ही योजना बंद करणार आहोत, अशी घोषणा कॉँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांनी केली.

भंडाऱ्यातील संकोलीमध्ये महाविकास आघाडीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली. यावेळी सभेला संबोधित करताना राहूल गांधी बोलत होते.

कॉँग्रेसचा जाहीरनामा हा जनतेचा जाहीरनामा आहे, असे सांगत राहूल गांधी यांनी आमचे सरकार आल्यास गरीब घरातील महिलांना वर्षाला लाखभर रुपये मिळणार, सरकारी नोकरी मिळणार,  सर्व परीक्षांचे पेपर सरकारी यंत्राने मार्फत घेतले जातील, जातीय जनगनणा केली जाणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, अशा अनेक घोषणा केल्या.

पुढे बोलताना राहूल गांधी म्हणाले, सामान्य नागरीक दररोज टॅक्स भारतात. मात्र, पंतप्रधान फक्त उद्योगपतींसाठी काम करत आहेत. मागील 10 वर्षात मोदींनी फक्त उद्योगपतींसाठी काम केले आहे. मुंबईचे विमानतळ देखील अडानिंच्या घशात घातले. विमानतळा पासून पायाभूत सोईसुविधां पासून सगळ्यांमध्ये अदानिंच्या खिशात पैसा जातो. काही उद्योगपतीच मोदी सरकार चालवत आहे. अन् मोदी 24 तास फक्त धर्माविषयी बोलतात

देश मरत असताना मोदींजींनी थाळी वाजवली 

कोरोना काळात लोक मरत होती. काही ठिकाणी ऑक्सीजन नव्हते, काही ठिकाणी रुग्णांसाठी बेड नव्हते. पण सगळीकडे फक्त मोदीजी दाखवले जात होते. देशात हजारो लोक मरत असताना मोदींजींनी थाळी वाजवाजला सांगितली. इतर देशातील पंतप्रधान लोकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. तेव्हा मोदीजी नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम करत होते असा गंभीर आरोप गांधी यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading