fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

मोदींचे तुकोबा स्वरूप चित्र काढणारा चित्रकार ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी मारतोय बँकांना खेटे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणाईला स्वावलंबी बनण्याचा संदेश देश त्यांच्यासाठी आत्मनिर्भर योजना आणली, या योजने अंतर्गत विविध प्रकारच्या लघु आणि माध्यम उद्योजकांना कर्ज देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच कोविड काळात फटका बसलेल्या व्यापारी, उद्योजक, कारागीर यांनाही सावरण्यासाठी मदत देण्याचा मानस आहे. मात्र स्थानिक बँक अधिकाऱ्यांची अनास्था, भाजप नेते, कार्यकर्ते यांची केवळ स्वप्नरंजने यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगदगुरू संत तुकाराम यांच्या स्वरूपातील पेंटिग काढणारे चित्रकार प्रेम बाबू माने मागील दोन वर्षांपासून बँकेचे खेटे घालत आहे.

आज पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे प्रेम माने यांनी काढलेले  मोदीजींचे आध्यात्मीक स्वरुपातील प्रभु रामलल्लांच्या छायेतील दुसऱ्या  तैल चित्राचे अनावरण सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई,  दिव्यांग रोहन कामीनी प्रेम माने यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 

या वेळी  बोलताना देहू येथील चित्रकार प्रेम बाबू माने म्हणाले की, वास्तव आर्ट नावाने पेंटिंग, ग्लास फ्रेम हा माझा व्यवसाय आहे, माझा मुलगा रोहन 100 टक्के दिव्यांग आहे. कोरोना काळात अनेक व्यवसायांना फटका बसला तसाच आर्थिक फटका मलाही बसला आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पाडण्यासाठी मला आर्थिक मदतीची गरज आहे, यासाठी मी बँक ऑफ महाराष्ट्र कडे कर्ज मागितले आहे, मागील दोन वर्षे मी त्यासाठी पाठपुरावा करतोय मात्र बँक अधिकारी दाद देत नाहीत, मला 10 लाख रुपयांचे कर्ज देण्याची संमती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यातही खोदा घातल्याने मला रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

संत तुकाराम यांच्या भक्तीत मी तल्लीन झालेला चित्रकार आहे, यामुळे आपले भाग्यविधाते  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मी संत तुकाराम स्वरूपात पेंटिग केले आहे, या पेंटिंग मला मोठ्या प्रमाणावर निर्माण करायच्या आहेत, त्यासाठीची संपूर्ण योजना माझ्याकडे तयार आहे, ति मी बँक अधिकाऱ्यांना दाखवली आहे. तसेच भाजपचे एक खासदार, एक माजी राज्यमंत्री आणि भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांना भेटून चित्र दाखवले त्यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले मात्र पुढे काहीच केले नाही.

माझ्या 100 टक्के दिव्यांग असलेल्या मुलाच्या सांगोपणासाठी माझ्याकडे आज कोणतेही साधन नाही. नरेंद्र मोदी यांच्या विविध पेंटिग करून मला माझा उदरनिर्वाह करायचा आहे. मात्र ढीम्म बँक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे केवळ माझे नुकसान झाले असे नाही तर जे पंतप्रधान सर्वसामान्य जनतेसाठी आहोरात्र काम करून देशाला विकसित करण्याचे स्वप्न बघत आहेत तिथे त्यांच्याच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या हेतुला सुरुंग लावत आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading