ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केली तुषार गांधींची कान उघडणी
मुंबई : तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक केली होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नाही. इतकच नव्हे तर तुषार गांधीचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे आहे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तुषार गांधी यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेत त्यांची कानउघडणी केली आहे.
एक्स हॅंडलवर पोस्ट शेयर करीत आंबेडकरांनी हा समाचार घेतला आहे. त्यात आंबेडकर यांनी म्हटले आहे की, तुम्ही केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच; पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना तसेच वर्ग, जात आणि धर्माच्या पलीकडे जावून सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे आहे. तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
पुढे बोलताना आंबोडकर म्हणाले आहेत की, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहिती नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे हे तुम्हाला माहीत नाही का? महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहिती नाही का? जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर निरर्थक गोष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवू नका. काळच सत्य परिस्थिती समोर आणेल. अशी वक्तव्य करून तुम्ही जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे.
Dear @TusharG,
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) April 12, 2024
Your recent statement is not only highly exclusionary and problematic but it also negates parliamentary democracy and one's strive for independent political leadership, which are not captive of class, caste and religion.
Your grandfather's movement against the…
