fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRA

धनंजय सावतांची मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनावर बोळवण, अर्चना पाटलांना मोठा दिलासा ?

धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील आणि ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात सरळ लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी सध्या आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. अशातच धाराशिव लोकसभा मतदारसंघातून इच्छूक असलेले आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी देण्यास आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे कमी पडल्याचे दिसून आले आहेत. मुंबईत गेलेले धंनजय सावंत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासनावर बोळवण केल्याने महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अर्चना पाटील यांना धाराशिवची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सावंत समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. तानाजी सावंतांचे समर्थक आणि धनंजय सावंत यांनी बंड केल्यानंतर हजारो समर्थकांसह मुंबई गाठली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याशिवाय परत यायचेच नाही. अशी ठाम भूमिका धनंयज सावंत यांनी घेतली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यात होणाऱ्या विधानसभेची तयारी करा, तसेच योग्य ठिकाणी संधी देऊ असे आश्वसान देऊन झालेला बंड शमवण्याचा प्रयत्न केला आहे.

सुरूवातीपासून धनंजय सावंत यांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती. त्यांनी आपला प्रचार सुरू करत जिल्ह्यातील अनेक गावांना, खेड्यांना, वस्त्यांना. त्यांनी भेटी दिली होत्या. मात्र अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज झाले होते. यातच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यातच भूम, परंडा आणि वाशी या तीन तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील इतर शहर आणि गावांमध्ये सावंत समर्थकांनी अर्चना पाटील यांना विरोध करायला सुरूवात केली. तर काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. मात्र शिंदेंसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading