fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पीएमपीएमएलच्या बसमार्गांमध्ये बदल

पुणे : दरवर्षी प्रमाणे यंदा देखील येत्या रविवारी (दि. १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच उपनगरांत मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. या दिवशी पुणे स्टेशन जवळील बोल्हाई चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्णहार अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थानक, ससून रोड व मोलेदिना बस स्थानक येथून सुटणाऱ्या बसेस पुणे स्टेशन आगार येथून सुटतील व परतीच्या वेळी बंडगार्डन कडून येताना वाडीया कॉलेज, अलंकार चौक व पुणे स्टेशन आगार या प्रमाणे येतील.
त्याचा तपशील खालील प्रमाणे –

  • १ २९, १४८, १४८अ, २०१ या मार्गाच्या बसेस जाता येता साधु वासवानी चौक, अलंकार चौक व पुढे नेहमीप्रमाणे संचलनात राहतील.
  • २ ३, ५, ६, ३९, ५७, १४०, १४०अ, १४१ या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जातेवेळेस नरपतगीर चौकातून अथवा
    के. ई. एम. हॉस्पिटल जवळून उजवीकडे वळून एम्प्लॉयमेंट ऑफिस, लालदेऊळ व पुढे पुणे स्टेशन डेपो स्थानकामधून संचलनात राहतील व परतीच्या वेळी त्याच मार्गाने संचलनात राहतील. मात्र जास्त गर्दी होऊन रस्ता बंद झाल्यास सदर मार्गाची वाहतुक नरपतगीर चौकातून करणेत येईल.
  • ३ २४, २४अ, ३१, २३५, २३६ या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जातेवेळेस नरपतगीर चौक अथवा के.ई.एम. हॉस्पिटल चौकातून रास्तापेठ पॉवर हाऊस, एम्प्लॉयमेंट ऑफिस जवळून लाल देऊळ, पोलीस मुख्यालय व पुढे नेहमीच्या मार्गाने जातील. मात्र परतीच्या वेळी तूर्त याच मार्गाने संचलनात राहतील.
  • ४ ८, ८१, ९४, १०८, १४३, १४४, १४४अ, १४४क, २८३ या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जाताना नरपतगीर चौक अथवा के.ई.एम.हॉस्पिटल चौकातून एम्प्लॉयमेंट ऑफिस मार्गे लाल देऊळ, पोलीस मुख्यालय, सरळ पुढे पुणे स्टेशन डेपोतून वळवून जी.पी.ओ. पासून सोडण्यात येतील व पुढे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील. (रास्तापेठ पॉवर हाऊस मार्गे)
  • ५ १४२, १४५, १४६ या मार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जाता-येता पेटीट इस्टेट स्थानकावरून सुटून जी.पी.ओ., लाल देऊळ, जिल्हा परिषद चौक, गाडीतळ मार्गे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील.
  • ६ ८६, ९८, १०२, १३१, १३२, १३३, १३३अ, १३५, १३७, १४७, १५८, १५९, १५९ब, १६२, १६४, १६५, १६९, २३४, २३७ या मार्गाच्या बसेस जुना बाजार, गाडीतळ चौकानंतर गाडीतळ, लाल देऊळ, कमिशनर ऑफिस व पुढे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील.
  • ७ ११२, १३९, १३९अ, १६०, १६८, १७५, १८२, २०४, २०८, मेट्रो शटल १७ या मार्गाच्या बसेस हडपसर अथवा मुंढवा गांवाकडून म.न.पा. भवन, चिंचवड व निगडीकडे जातांना वेस्टएन्ड नंतर लाल देऊळ, जिल्हा परिषद व पुढे नेहमीच्या मार्गाने नियोजित स्थळी जाता येता संचलनात राहतील.
  • ८ १७०, १७२, १७७, १८६, १८७, २०३ या बसमार्गाच्या बसेस पेटीट स्थानकामधून साधु वासवानी चौक, जी.पी.ओ., पोलीस मुख्यालयाजवळून जाता येता संचलनात राहतील.
  • ९ ९, १७४ या बसमार्गाच्या बसेस पेटीट स्थानकाहून पुढे नेहमीच्या मार्गानी जातील. परतीच्या वेळी त्याच मार्गाने पेटीट स्थानकावर येतील.
  • १० १५१, १५४, १५५, १६३, १६६, ३१५ या बसमार्गांवरील बसेस सकाळ पासून पेटीट स्थानक येथून संचलनात राहतील.
  • ११ ११५, २२५, ३१७, ३२५, ३३३, ३४८, ३५७, या बसमार्गाच्या बसेस पुणे स्टेशनकडे जाते वेळेस गाडीतळ, लाल देऊळ,कमिशनर ऑफिस, पेटीट स्थानकाकडे जाता-येता अशा संचलनात राहतील.
  • १२ ३११, ३१२, ३६६ सदर बसमार्गाच्या बसेस वाहतुक पेटीट स्थानकावरून अलंकार टॉकिज, रूबी हॉल अशा संचलनात राहतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading