शिवसेनेने, स्व वसंतदादां विषयीचे ऋणानुबंध लक्षांत घेता, ‘सांगली’ ची जागा मोठ्या मनाने काँग्रेस’ला सोडावी – राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : मुंबईत शिवसेनेच्या स्थापने वेळी महाराष्ट्रात स्व. वसंतदादा पाटील यांचे नेतृत्वाखालील सरकार होते. मुंबईत प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पुढे आला होता. त्यावेळी ‘केंद्रस्थानी असलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या काँग्रेस श्रेष्ठींना, योग्य पध्दतीने वास्तवता समजाऊन, महाराष्ट्राची अस्मिता जपत, शिवसेने सारख्या प्रादेशीक पक्षाची पायाभरणी झाली. तेंव्हा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी केलेले अभूतपुर्व सहकार्य मौलीक होते . याबाबतचे पुरक वक्तव्य स्व बाळासाहेब ठाकरे यांनी देखील केले होते. काही काळ स्व. वसंतदादा बाजू घेत असल्यामुळे सेनेस काही काळ ‘वसंत सेना’ देखील संबोधले गेले. मात्र आज त्याच वसंतदादा पाटील यांच्या सांगली मतदार संघासाठी काँग्रेसला वारंवार मनधरणी वा याचना करावी लागू नये, हीच राज्यातील समस्त काँग्रेसजनांची भावना आहे..!, अशा शब्दात काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी शिवसेनेकडे ‘‘सांगली’ ची जागा काँग्रेस’ला सोडावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात पुढे गोपाळदादा तिवारी यांनी असे म्हंटले आहे की, ” सांगलीचे शिवसेनेचे ऊमेदवार चंद्रहार पाटील यांनी देखील ‘काँग्रेसचे संभाव्य ऊमेदवार विशाल पाटील व सांगली’साठी सकारात्मक सहकार्य करण्याची तयारी व मानसिकता ही दर्शवली होती, हे देखील विसरतां कामा नये.
श्रीमती सोनियाजींनी प्रसंगी राज्याच्या हितासाठी, प्रसंगी तत्वांना आवर घालुन, किमान समान कार्यक्रमावर आपल्या नेतृत्वा खालील मविआ सरकारला पाठींबा ही दिला.. याचे ही आधाडी धर्माचे पालन करीत सेना नेत्यांनी स्मरण ठेवावे व मोठ्या मनाने, प्रगल्भता दाखवून स्व वसंतदादा पाटीलांचा ऐतिहासीक वारसा असलेल्या सांगली’ची जागा काँग्रेस’ला सोडावी असे विनम्र आवाहन. तसेच माजी मंत्री व सांगलीचे युवा नेते डॅा विश्वजीत कदम यांनी प्रकट केलेल्या “सांगलीकर – काँग्रेसजनांच्या” भावनांचाही आदर करावा, असेही आवाहन केले..! तसेच, आज जर स्व पतंगराव कदम असते तर ही वेळ आली असती काय(?) अशी पुस्ती ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा यांनी जोडली..!
सातारा लोकसभेचे खासदार निवासजी पाटील जर निवडणुक लढवत नसतील.. तर सातारा जिल्ह्यातील समस्त काँग्रेसजनांचा आग्रह पाहून ती जागा पवार शरदरावजी साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस करीता सोडावी, असेही विनम्र व विनंती वजा आवाहन राज्य काँग्रेस तर्फे करत असल्याचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले..! इंडीया आधाडीच्या जेष्ठ व श्रेष्ठ नेत्यांनी व्यापक देशहित, राज्याचे हित, संविधान व लोकशाही करीता ‘ऐक्य भावनेला’ सर्वोपरी प्राधान्य देण्याची गरज आहे..! तसेच, मा शरदरावजी पवार साहेब यांनी “स्व राजीव गांधी सोबतचे ऋणानुबंध लक्षात घेऊन, स्व राजीव गांधींनीच राजकारणात पाचारण केलेल्या मा पृथ्वीराजजी चव्हाण यांचे साठी सातारा काँग्रेसला देणे बाबत विचार करावा” व इंडीया आघाडीतील कार्यकर्त्यांचे आपल्या विषयीचा आदरभाव आणखीन द्वीगुणीत करावा, अशी प्रेमाची व आग्रही विनंती करणारे आवाहन समस्त महाराष्ट्रातील काँग्रेसजनां तर्फे काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले..असल्याचे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे..!!
