Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महाराष्ट्र राष्ट्रीयविधी विद्यापीठ, मुंबई सोबत सामंजस्य करार

 

संयुक्तपणे विधी विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम
राबविण्यासाठी तसेच संशोधन वाढीसाठी एकत्र काम करणार.

पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई यांच्यात सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी व प्रा.डॉ. दिलीप उके, कुलगुरु, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे, प्रा. डॉ. प्रतापसिंह साळुंके, कुलसचिव,महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्यचे संचालक प्रा. डॉ. संजय ढोले, विधी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ.नरेश वाघमारे यांच्या या सामंजस्य करारावर सह्या करून कराराचे आदानप्रदान करण्यात आले.

संयुक्तपणे विधी विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाभिमुख पदवी,पदविका अभ्यासक्रम राबवून संशोधन वाढीसाठी एकत्र काम करणार असल्याचे कुलगुरु प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी यावेळी सांगितले. विधी विद्यार्थ्यांसाठी विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रे आणि कार्यक्रमाचे आयोजन संयुक्तपणे करण्यात येणार असल्याचे डॉ. दिलीप उके, कुलगुरु, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई यांनी यावेळी सांगितले.

या सामंजस्य करारांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई यांच्यामध्ये विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचेही आदान प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच संशोधनासाठी दोन्ही विद्यापीठाच्या रिसोर्सचाही संयुक्तपणे वापर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading