JEE आणि NEET च्या तयारीसाठी योग्य नियोजन आवश्यक
– शिक्षणतज्ञ एनव्ही सरांनी करिअर मार्गदर्शन सेमिनारमध्ये दिला यशाचा गुरूमंत्र
पुणे : JEE, NEET सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी योग्य नियोजन आणि चिकाटी अत्यंत महत्त्वाची आहे. या परीक्षांचा अभ्यासक्रम एकच असला तरी प्रत्येकाची तयारी वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते. तसेच यामध्ये विद्यार्थ्यांसोबतच पालकांचा सहभाग देखील आवश्यक आहे, अशा शब्दांत शिक्षणतज्ञ नितीन विजय तथा एनव्ही सरांनी करिअर मार्गदर्शन सेमिनारमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि मोशन एज्युकेशनचे संस्थापक व सीईओ नितीन विजय म्हणजेच एन.व्ही. सर यांनी आज मोशनच्या विमाननगर स्टडी सेंटरमध्येच्या वतीने आयोजित करिअर मार्गदर्शन सेमिनारमध्ये ‘मास्टर क्लास’ घेतला. पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या एन.व्ही. सरांच्या या ‘मास्टर क्लास’ला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नितीन विजय म्हणाले की, कोणत्याही यशामागे केवळ कोचिंगच नाही तर विद्यार्थी आणि त्याच्या पालकांचाही मोठा वाटा असतो. विद्यार्थी नियमितपणे वर्गात जातो, गृहपाठ वेळेवर पूर्ण करतो, दररोज अभ्यास करतो, शिक्षकांचे ऐकतो आणि नियमित चाचण्या देऊन त्याच्यातील उणिवा सुधारतो तेव्हाच अभ्यासाची एक उत्तम प्रणालीतयार होते, अन् अपेक्षीत निकाल देऊ शकते. यासाठी आम्ही अद्ययावत अभ्यास साहित्य आणि तंत्रज्ञान समर्थनासह अनुभवी प्राध्यापकांकडून अभ्यासक्रम ऑफर करतो. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केल्यानंतर नियमित चाचण्याही घेतल्या जातात. राजस्थानमधील कोटामध्ये उपलब्ध असलेल्या या सुविधा आता विमान नगरमध्येही उपलब्ध आहेत.
पालकांच्या सहभागाबद्दल बोलताना ते म्हणाले, परीक्षेच्या तयारी दरम्यान पालकांनी मुलाशी रोज बोलून त्याच्या दिनचर्येवर लक्ष ठेवले पाहिजे. घरातील समस्या आणि वादांपासून विद्यार्थ्याला दूर ठेवले पाहिजे. मुलांना प्रत्येक परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करा आणि त्यांना त्यांच्या चुका ओळखण्यास आणि सुधारण्यास मदत करा. परीक्षेत मार्क्स कमी असतील तर मुलाला त्याच्या बाजूने चांगले करायला सांगा, जो काही निकाल येईल तो आम्ही मनापासून स्वीकारू. या आश्वासनामुळे त्यांना धीर दिल्यास विद्यार्थी नैराश्या पासून दूर राहतील, असे ही त्यांनी सांगितले.
मान्यवरांचे स्वागत गौरव शर्मा यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र खांदवे यांनी केले तर आभार नितीन भुजबळ यांनी मानले,
