Lok Sabha Election 2024 : जालन्यातून मनोज जरांगे पाटील; मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय
जालना : लोकसभा निवडणुकीसाठी गल्ली पासून दिल्ली पर्यंत सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अनेक पक्षाच्या उमेदवार याद्या जाहीर झाल्या असून प्रचाराला देखील सुरूवात झालेली आहे. मात्र या निवडणुकीत मराठा आंदोलकांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे. कारण जिल्हास्तरावर मराठा समन्वयकांच्या बैठका घेतल्या जात आसून त्यांच्यावतीने एखाद्या उमेदवाराला पाठिंबा किंवा त्यांच्यावतीने एखादा उमेदवार उभा करण्या विषयी चर्चा केली जात आहे. त्यानुसार आज मराठा समाजाची जालना जिल्हास्तरीय बैठक आज पार पडली. अन् त्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी, असा एकमताने ठराव संमत करण्यात आला. तसेच अपक्ष उमेदवार नकोचं, अशी भूमिका देखील मांडण्यात आली आहे.
आज जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद, जालना आणि बदनापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या बैठका घेण्यात आल्या. या समाजाच्या बैठकीत मराठा समाजाने स्वातंत्र्य उमेदवार दिला, तर त्याचा परिणाम काय होईल.? यावर चर्चा करण्यात आली. अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यास मराठा आंदोलनाला विरोध करणाऱ्या पक्षांना अप्रत्यक्ष फायदाच होईल, त्यामुळे अपक्ष उमेदवार नकोच असा सूर या बैठकीत निघाला. तसेच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीच जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा एकमताने ठराव संमत करण्यात आला.
दरम्यान, यावर मनोज जरांगे पाटील उद्या काय निर्णय घेणार? यावर आता आंदोलकांचे लक्ष आहे.
