Lok Sabha Election 2024 : मराठा समन्वयक बैठकीत फिल्मी स्टाईल हाणामारी
छत्रपती संभाजीनगर : येथील मराठा मंदिरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी मराठा (Maratha) समजाच्या समन्वयकांची एक बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीत चर्चा होण्या ऐवजी फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर महिला देखील एकमेकिणां भिडल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी मराठा समन्वयकांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, यामध्ये काही जण शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या कडून पैसे घेवून बैठकीसाठी आल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
त्यापूर्वी या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी अनेक नावे सुचवण्यात आली. पण विकी राजे पाटील नावाच्या व्यक्तीने यातील काही नावांना विरोध केला आणि नव्या नावाला संधी द्या अशी मागणी केली. तसेच आपल्या स्वतःला उमेदवारी द्यावी, अशीही मागणी केली. येथूनचा वादाला सुरुवात झाली. बाळू औताडे नावाच्या समन्वयकांने आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करत विकी पाटील यांना मारहाण करण्यात आली आहे. बघता बघता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. काही मोजक्या लोकांना मारण्यासाठी एक मोठा गट चालून गेला होता.
