Saturday, June 20, 2026
ENTERTAINMENTLatest NewsNATIONALTOP NEWS

फक्त कंगनाच देशाची मुलगी आहे का? पॉर्नस्टारशी तुलना केल्याने मोदी परिवारवर भडकली गायिका 

मुंबई : अभिनेत्री कंगना रानऊतला रणावतला भाजपने हिमाचल प्रदेश मधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्या नंतर काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. मोदी परिवार कडून सुप्रिया श्रीनेत यांच्यावर जाहीर टीका केली जात आहे. त्यातच आता मोदी परिवारातील एका कार्यकर्त्यांकडून गायिका नेहा सिंह राठोडची तुलना एका पॉर्नस्टारशी करण्यात आली आहे. यावर भडकलेल्या गायिकेने ‘फक्त कंगनाच देशाची मुलगी आहे का?’, असा संतप्त सवाल भाजपला विचारला आहे.

नेमका प्रकार काय आहे?

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहा आणि पॉर्न स्टार मिया खलिफा यांच्या फोटोंची तुलना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही पोस्ट मोदी परिवारातील एका भाजपच्या कार्यकर्त्याने केली आहे. कंगनाची बदनामी केल्याने भडकलेल्या भाजप पक्षाच्या एका कार्यकर्त्या कडूनच ही पोस्ट केली गेल्याने गायिका नेहा राठोड संतापली आहे. विशेष म्हणजे या पोस्टवर अनेक अश्लील कमेंट्स देखील करण्यात येत आहे. त्यामुळे नेहा राठोडने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आज सकाळपासून भाजपचे आयटी सेल आणि छोटे-मोठे नेते पॉर्नस्टार मिया खलिफासोबतचा माझा फोटो ट्रेंड करत आहेत आणि मला त्रास देत आहेत, हे दिसत नाही का? अशा रीतीने मुलगी वाचणार का? असा प्रश्नही तिने केला. यासोबतच नेहा सिंहने उत्तर प्रदेश सरकारवर प्रश्नांच्या फैऱ्या झाडल्या आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, पाहताय ना योगीजी कशाप्रकारे एका बिहारच्या मुलीला आणि उत्तर प्रदेशच्या सूनेला सोशल मीडियावर बदनाम केले जात आहे. माझी चूक काय आहे? मी सरकारला प्रश्न विचारते? ज्या गोष्टींसाठी माझं कौतुक करायला हवं, त्यासाठी माझा अपमान केला जातोय, हेच का ते भाजपचे सुशासन? मुलींचे संरक्षण असे करणार असे सवालच नेहाने मुख्यमंत्री योगी आदित्य यांना केला.

https://x.com/nehafolksinger/status/1772291497679106290?s=20

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading