Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

संशोधन  कार्याची   गुणवत्ता महत्वाची – डॉ.शिवाजी मुंढे

पुणे   : संशोधन कार्याच्या गुणवत्तेवर संशोधनाचा दर्जा अवलंबून असतो,असे मत यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) चे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांनी व्यक्त केले.

यशस्वी संस्थेतर्फे   नुकत्याच (शनिवारी दि.२३मार्च)आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय संशोधन पद्धतीवरील एकदिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पीएच.डी. संशोधन केंद्र असलेल्या यशस्वी संस्थेच्या या कार्यशाळेत डॉ.सिद्धार्थ शिंपी व डॉ.अभिषेक भट या तज्ञ् व्याख्यात्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील पन्नासहुन अधिक विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. प्रा.युगंधरा पाटील यांनी या कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले, तर डॉ.सचिन मिसाळ, डॉ.अश्विनी ब्रह्मे व डॉ. वंदना मोहांती यांनी या एकदिवसीय कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading