Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाव; १२ एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज

बारामती : बारामती लोकसभा मतदार संघामध्ये तिहेरी लढत रंगणार आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या लढाईत आता शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचा देखील समावेश झाला आहे. बारामती लोकसभा मतदार संघामधून निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत.

बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी जाहीर केली. इतकेच काय तर निवडणूक अर्ज कधी भरणार याबाबत देखील त्यांनी माहिती दिली आहे. १२ एप्रिलला १२ वाजता लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले.

पुरंदरमधील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवतारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘‘मी १२ एप्रिल रोजी १२ वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांचे १२ वाजवणार आहे,’’ अशी घोषणा शिवतारे यांनी केली आहे
पुढे ते म्हणाले, ‘‘लोकसभेसाठी आता लोक सांगत आहेत की माघार घेऊ नका. लोक मला कानात सांगतात ही त्यांची भीती आहे. यामुळे आता पर्याय हवा आहे. मतदार संघातून पवार रुपी हुकूमशाही संपवण्यासाठी आता माझे धर्मयुद्ध आहे.’’

यावेळी त्यांनी अजित पवार यांचे राजकारण स्वार्थाचे असल्याचे म्हटले. आता १ तारखेला सभा घेणार आहे. माझी लढाई म्हणजे जनसामान्यांची लढाई आहे. यामुळे या सभेला ५० ते ६० हजार लोकांची उपस्थिती असणार आहे. त्यानंतर सगळ्या विधानसभा मतदार संघात सभा घेणार आहे. मला निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर ते लोकांपर्यंत पोहोचवले जाईल. मतदारसंघात मला प्रचंड प्रतिसाद मिळत असून माझा विजय होणारच,’’ असा विश्वासही विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading