सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची शिवसृष्टीला भेट
पुणे : सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी शिवसृष्चीला भेट दिली. सकाळी ९ पासून १२ वाजेपर्संत संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली, पहिल्या टप्प्याचे पूर्ण झालेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले, तसेच पुढील तीन टप्प्यांच्या कामाची माहिती त्यांनी घेतली.
छत्रपतींचा इतिहास फक्त अफजलखान वऱ्धा पासून शाहिस्तेखानाची बोटे तोडण्या पुरता मर्यादित नसून हिंदवी स्वराज्य निर्माता, म्हणून त्यांच्या इतिहासाचे दर्शन या माध्यमातून झाले पाहिजे.स्वतःचे राज्यविस्ताराचे स्वप्न त्यांनी पाहिले नाही,आपल्या प्रमाणे इतरांनी आपला राज्यविस्तार करावा. शेती , व्यापार , स्वधर्म स्वभाषा यांचा विचार झाला.गेल्या ३५० वर्षात छत्रपतींचा विचार घेऊन पेशवे, होळकर, गायकवाड यांच्या प्रमाणे राजपुतांनी देखील संघर्ष केला स्वातंत्र्या नंतरही हा विचार पुढे नेला गेला हे येथील विविध प्रदर्शनीतून दिसेल अशा शुभेच्छा मा मोहनजींनी दिल्या.
प्रकल्पाची माहिती विश्वस्त जगदीश कदम यांनी दिली,शाल , शिंदेशाही पगडी आणि कवड्यांची माळ घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.
