Sunday, April 5, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

शेवटी  अमित ठाकरे म्हणाले ,  राज ठाकरे यांनी अजूनही माझ्यासाठी ते केल नाही…… *

सध्या  झी युवा वाहिनीतर्फे देण्यात येणाऱ्या झी युवा सन्मान पुरस्कार २०२४ या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. युवावर्ग हा समाजाचे भविष्य आहे असे नुसते बोलून नव्हे तर  समाजातील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या युवकांना शोधून त्यांच्या  शिरपेचात  झी युवा सन्मान पुरस्काराचा तुरा रोवण्याचा ध्यास झी युवा वाहिनीने घेतला आहे. यावर्षी विविध क्षेत्रांतील प्रयोगशील तरूणांना झी युवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले  आहे. अशा कर्तबगार तरूणांच्या यादीत श्री अमित राज ठाकरे यांनी यंदाच्या झी युवा नेतृत्व सन्मान पुरस्कारावर नाव कोरले आहे, रविवार दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर झी युवा सन्मान पुरस्कार २०२४ हा सोहळा प्रसारीत होणार आहे. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांचे या सोहळ्याला सहकार्य मिळाले आहे.

झी युवा सन्मान पुरस्कार सोहळ्यात अमित ठाकरे यांनी एक वक्तव्य केले…. आणि या वक्तव्यात त्यांनी राज ठाकरे यांनी अजूनही त्यांच्यासाठी काय केले नाही याची खंत व्यक्त केली. अर्थात अमित ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे अनेक तर्क-वितर्क निर्माण झाले आहेत.

अमित ठाकरे यांचे वक्तव्य:
“माझ्या वडिलांनी मला नेहमी प्रेरणा दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. पण अजूनही त्यांनी माझ्यासाठी एक काम केलेलं नाही आणि ते म्हणजे मला एखादा कौतुकाचा मेसेज करणं.”
“मी माझ्या वडिलांचा आदर करतो आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयाचं पालन करतो. पण मला त्यांच्याकडून प्रोत्साहनाचा मेसेज मिळण्याची इच्छा आहे.कदाचित मी अजुन म्हणावे तसे  काही केले नसेल मात्र मी त्या दिवसाची वाट पाहीन .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading