Saturday, June 6, 2026
Latest NewsSports

दिक्षीत रॉयल्स्, न्युट्रीलिशियस संघांची विजयी सलामी !!

पुणे :  लायन्स् इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३२३४ डी२ तर्फे आयोजित १४ व्या ‘लायन्स् प्रिमियर लीग’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिक्षीत रॉयल्स् आणि गतविजेत्या न्युट्रीलिशियस संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सागर नाईक या च्या अष्टपैलु खेळीमुळे दिक्षीत रॉयल्स् संघाने रूद्र वॉरीयर्स संघाचा १३ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना दिक्षीत रॉयल्स्ने १६८ धावांचे आव्हान उभे केले. अथर्व तांदळे (४२ धावा), सागर नाईक (३६ धावा) आणि श्रीनिवास सरवदे (३६ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. तिसर्‍या गड्यासाठी श्रीनिवास आणि अथर्व यांनी ४३ चेंडूत ६७ धावांची भागिदारी केली. या धावसंख्येचा पाठलाग करताना रूद्र वॉरीयर्सचा डाव १५५ धावांवर मर्यादित राहीला. अमर खेडेकर (३८ धावा), अमित गणपुळे (४४ धावा) आणि सौरभ रवालिया (२३ धावा) यांनी प्रतिकार केला.

दुसर्‍या सामन्यात सचिन थोपटे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर न्युट्रीलिशियस संघाने साची सुपर किंग्ज्चा २८ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्युट्रीलिशियस संघाने १६४ धावांचे आव्हान उभे केले. अमित सिंग याने नाबाद ६४ धावांची खेळी केली. अमित याला समाधान दांडेकर (३२ धावा) याने उत्तम साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना साची सुपर किंग्ज्चा डाव १३६ धावांवर आटोपला. जगदीश सुर्वे (३४ धावा), देवदत्त देवकर (२६ धावा) आणि मनोहर पाटील (नाबाद २५ धावा) यांनी प्रतिकार केला. सचिन थोपटे याने २८ धावात ४ गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
दिक्षीत रॉयल्स्ः २० षटकात ५ गडी बाद १६८ धावा (अथर्व तांदळे ४२, सागर नाईक ३६, श्रीनिवास सरवदे ३६, अमित गणपुळे २-२५);(भागिदारीः तिसर्‍या गड्यासाठी श्रीनिवास आणि अथर्व यांच्यात ६७ (४३) वि.वि. रूद्र वॉरीयर्सः १८ षटकात १० गडी बाद १५५ धावा (अमर खेडेकर ३८, अमित गणपुळे ४४, सौरभ रवालिया २३, सागर नाईक ३-१७, भुषण देशपांडे ३-२५, श्रीनिवास सरवदे २-३०); सामनावीरः सागर नाईक;

न्युट्रीलिशियसः २० षटकात ६ गडी बाद १६४ धावा (अमित सिंग नाबाद ६४ (४१, ५ चौकार, ६ षटकार), समाधान दांडेकर ३२, मनोहर पाटील १-२६) वि.वि. साची सुपर किंग्ज्ः १९.३ षटकात १० गडी बाद १३६ धावा (जगदीश सुर्वे ३४, देवदत्त देवकर २६, मनोहर पाटील नाबाद २५, सचिन थोपटे ४-२८, विजय शितोळे २-२१, किर्ती पाटील २-२१); सामनावीरः सचिन थोपटे;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading