आमदार रोहित आणि युगेंद्र पवार यांना सुरक्षा देण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. याठिकाणी खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे, यामुले पवार विरुद्ध पवार असा सामना इथे रंगणार आहे. सुप्रिया सुळे यांचे भाचे आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे प्रचारासाठी दौरे करत असताना त्यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक घेराव घातला जात आहे, दमदाटी करण्यात येत आहे ही बाब गंभीर असून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात दोघांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी खासदार सुपऱ्या सुळे यांनी पुणे पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे की, लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आ. रोहित पवार व युगेंद्र पवार हे दौन्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. संविधानिक पध्दतीने, शांतपणे लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत.
परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव धालून त्याचा आवाज प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली. संबंधितांची ही कृती पूर्णपण असंविधानिक आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकरानी राज्यघटनेद्वारा बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकाच्या अभिव्यकी स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घडविलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात अस पडण शोभादायक नाही. या घटनामुळे त्याच्या सुरक्षिततेचे प्रनिर्माण झाला आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे ही अतिशय चितेची व गभीर बाब आहे. सुसंस्कृत व विद्येचे माहेरघर अत्तमाऱ्या पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही. यामुळे आपणाकडून आ. रोहित पवार व युगेंद्र पवार यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन त्याना आवश्यक ती सुरक्षा तातडीने पुरविण्यात यावी ही विनंती आहे आपण याबाबत विनाविलंब कार्यवाही कराल असा विश्वास आहे.
