Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

पुण्यात रोबोटिक सर्जरीद्वारे गंभीर गुडघेदुखीवर यशस्वी उपचार

पुणे : – गुडघ्याची गंभीर दुखणी साधारणपणे ऑस्टिओआर्थरायटिस, संधीवात तसेच भूतकाळात झालेली दुखपात अशा गोष्टींशी निगडीत असतात. जगभरात या दुखण्यांमुळे लाखो लोकांच्या आयुष्यावर वेदनांची गडद छाया पसरलेली असते. अशा गंभीर दुखण्यांमुळे रुग्णांच्या दैनंदिन जगण्यातील हालचालींवर मर्यादा येतात व त्यांचा जगण्याचा दर्जा घसरतोच.  पण सांधेदुखीवरील उपचारांमध्ये रोबोटिक सर्जरीने लक्षणीय प्रगती करत एक नवा टप्पा गाठला आहे.याच अंतर्गत  पुण्यातील डेक्कन हर्डिकर हॉस्पिटलमध्ये  ७४ वर्षांच्या महिलेच्या गुडघेदुखीवर रोबोटिक सर्जरीने यशस्वी उपचार करण्यात आले. ही  महिला  छत्तीसगढमधील जगदलपूर येथील रहिवाशी आहे. तसेच अनेक वर्षं संधीवाताने ही महिला ग्रस्त होती. त्यासोबतच मधुमेह, हायपरटेन्शन आणि वेरिकोस वेन्स हे आजारही या महिलेला होते.प्रत्येक दिवस हा या महिलेसाठी  गुडघ्यांची वेदना व हालचालींवर मर्यादा घेऊनच उगवत असे.मात्र, पुण्यातील डेक्कन हर्डिकर हॉस्पिटलमधील नावाजलेले नी रिप्लेसमेंट सर्जन डॉ. सौरभ गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेने उपचार सुरू केले. यातूनच या महिलेला वेदनेतून मुक्त होण्याची नवी वाट सापडली.  रोबोटिक रिप्लेसमेंट सर्जरी ही शस्त्रक्रिया अत्यंत अचूकतेने आणि शरीरावर कमीतकमी छेद देत केली जाते. त्यामुळे या महिलेसाठी ही शस्त्रक्रिया म्हणजे गुंतागुंतीच्या दुखण्यांवरील सर्वोत्तम पर्याय ठरला.

तसेच वेरिकोज वेन्ससारख्या नाजूक व गंभीर आजाराला अत्यंत अचूकतेने आणि वैयक्तिक मुद्दे लक्षात घेत सांभाळणे जोडीला  त्यासह शस्त्रक्रिया करणे या पद्धतीमुळे डॉक्टरांना शक्य झाले. यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान कोणतीही गुंतागूंत होण्याची शक्यता कमी झाली. तसेच, सांधे बरे होणे व रक्तवाहिन्यांचे त्रास कमी होण्यासाठी कमी आवधी लागला. तसेच  रुग्ण महिलेला फारच कमी वेळात बरे होता आले. आता  रोबोटिक रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर या महिलेमध्ये दररोज अत्यंत लक्षणीय असे बदल दिसू लागले. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या पाच दिवसांत ही महिला विमानाने आपल्या घरी परत जाऊ शकली. तर आजच्या  घडीला ही महिला सहजपणे पाच किलोमीटर चालू शकते.  डॉ. गिरी  यावेळी म्हणाले की,  रोबोटिक सर्जरीमुळे  या महिलेच्या आयुष्यात फार सकारात्मक बदल झाले आहेत. या प्रकारचे त्रास सहन करणाऱ्या अनेकांसाठी ही आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती ही  एक प्रेरणादायी बाब  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading