Tuesday, June 16, 2026
Latest NewsSports

नायर ईगल्स् संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला !!

पुणे  लायन्स् इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३२३४ डी२ तर्फे आयोजित १४ व्या ‘लायन्स् प्रिमियर लीग’ टी-२० क्रिकेट स्पर्धेत धीरज कदम याच्या फलंदाजीच्या जोरावर नायर ईगल्स् संघाने जाधव नाईट रायडर्स संघाचा ८ गडी राखून पराभव करत स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूलच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा फलंदाजी करताना जाधव नाईट रायडर्स संघाने १४१ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये विपूल जेऊरकर याने नाबाद ८६ धावांची खेळी केली. विपूल याला प्रशांत तेलंगे (२८ धावा) आणि विशाल बारणे (२१ धावा) यांनी मोलाची साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना नायर ईगल्स् संघाच्या सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली. धीरज कदम याने ६० धावांची तर, राहूल कामठे याने नाबाद ५० धावांची खेळी करताना ८७ चेंडूत १११ धावांची भागिदारी रचली आणि संघाला विजयाचे दार दाखविले. नायर ईगल्स्ने १८ षटकात व २ गडी गमावून हे आव्हान पूर्ण करत विजयी सलामी दिली.

स्पर्धेचे उद्धघाटन लायन ३२३४ डी२ चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी आणि माजी जिल्हा लायन गव्हर्नर लायन फत्तेचंद रांका यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डिस्ट्रीक्ट समन्वयक लायन वसंतभाऊ कोकणे आणि लायन अनंत देशमुख तसेच सहभागी संघातील खेळाडू व प्रशिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
जाधव नाईट रायडर्सः २० षटकात ४ गडी बाद १४१ धावा (विपूल जेऊरकर नाबाद ८६ (६४, १० चौकार, २ षटकार), प्रशांत तेलंगे २८, विशाल बारणे २१, संभाजी शिंदे २-१२) पराभूत वि. नायर ईगल्स्ः १८ षटकात २ गडी बाद १४५ धावा (धीरज कदम ६० (४५, ८ चौकार, १ षटकार), राहूल कामठे नाबाद ५० (५२, ७ चौकार), शिवाजी माने १-१४);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी धीरज आणि राहुल यांच्यात १११ (८७); सामनावीरः धीरज कदम;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading