Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरची धडक

सातारा : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिली. या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरुप बचावले आहेत. साता-यातील वाईजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. रामदास आठवले वाईहून मुंबईच्या दिशेला येत होते. या दरम्यान एका कंटेनरने त्यांच्या गाडीला धडक दिली. रामदास आठवले दुस-या वाहनाने मुंबईच्या दिशेला निघाले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading