Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

Earthquake : आज पहाटे मराठवाड्यात जाणवले भूकंपाचे धक्के

परभणी :नांदेड व हिंगोली आणि परभणी  जिल्ह्यातील काही तालुक्यांना गुरुवारी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांना भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.
सकाळी सहा तर काही भागात सहा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास काही नागरिकांना काही सेकंद जमीन हलल्याचा भास झाला, काहींनी तातडीने कुंटूबियांसह इतरांना सावध केले.अन्यत्र अंदाज घेतला, तेव्हा अन्यत्र सुद्धा काही सेकंद सौम्य झटका जाणवल्याच्या माहिती समोर आली. या सौम्य झटक्याने दरवाजे, खिडकी,फँन बेड व अन्य वस्तू हलल्याची माहिती सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी श्रीपाद देशपांडे यांनी दै.दिलासाशी बोलताना दिली.
जिल्ह्यातील सोनपेठ, मानवत व जिंतूर अन्य तालुक्यात सुद्धा आज धक्का जाणवल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटू लागल्या, या संदर्भात काहींनी अन्य जिल्ह्यात विचारपूस केली तेव्हा हिंगोली व नांदेड जिल्ह्यातही भूकंपाचा सौम्य झटका जाणवल्याच्या बातम्या येऊन धडकल्या.शहरी भागात 4.5 तर नांदेड जिल्ह्यात 4.2 एवढा भूकंपाचा झटका होता अशी माहिती हाती आली आहे.

हिंगोलीतील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र

२१ मार्च रोजी सकाळी 06:08:30 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे. लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे  सकाळी 06:19:05 वाजता 3.6 रिश्टर स्केल चा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. मात्र या भूकंपाचे केंद्र तिन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. याही भूकंपाची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील 1993 च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा आहे. यावेळेस हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसल्याचे फोन आले.

श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र,  छत्रपती संभाजीनगर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading