तुकाराम बीज निमित्त पुणे व पिंपरी चिंचवड शहर परीसरात जादा बसेसची सोय
पुणे : येत्या 27 मार्चला ‘तुकाराम बीज’ आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी देहूगाव येथे या दिवशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. असंख्य भावीक तुकाराम बीज निमित्त पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच उपनगरांतून देहूगाव येथे येत असतात. या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ‘पीएमपीएमएल’ कडून देहूगावसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ही व्यवस्था नेहमीच्या तिकीट दराने करण्यात येत आहे. देहूगाव व आळंदी साठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेल्या स्थानकांची/ठिकाणांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
बसमार्गाचे नाव स्थानकाचे नाव
१ स्वारगेट ते देहूगाव – स्वारगेट व देहूगाव स्थानक
२ मनपा भवन ते देहूगाव – मनपा भवन व देहूगाव स्थानक
३ मनपा भवन ते आळंदी – मनपा भवन व आळंदी स्थानक
४ देहूगाव ते आळंदी – देहूगाव व आळंदी स्थानक
५ स्वारगेट ते आळंदी – स्वारगेट व आळंदी स्थानक
६ पुणे स्टेशन ते देहूगाव – पुणे स्टेशन डेपो व देहूगाव स्थानक
७ निगडी ते देहूगाव – निगडी व देहूगाव स्थानक
८ हडपसर ते आळंदी – हडपसर व आळंदी
पीएमपीएमएलने दिलेल्या माहितीनुसार, देहूगाव येथून परतीच्या प्रवासासाठी देहूगाव येथील झेंडे मळ्याजवळ मिलिटरी परिसरातील उजव्या बाजूच्या मोकळ्या जागेत परिवहन महामंडळाचे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात असून सदर ठिकाणाहून वरील जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच देहूगाव ते आळंदी दर्शन जाण्याकरीता देहूगाव-आळंदी रस्त्यावर गाथा परिसरातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज क्रिडांगणाजवळील गायरानाच्या मोकळ्या जागेतून जादा बसेस सोडण्यात येतील. या जादा बसेसची व्यवस्था दि. २६/०३/२०२४ ते दि. २८/०३/२०२४ अखेर करण्यात आलेली आहे. तरी वरील बससेवेचा लाभ सर्व भाविक-भक्तांनी व प्रवाशी नागरिकांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात
