Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

पीएमपीएमएल डिझाईन स्टुडिओ संकल्पनेला ए एस आर टी यु कडून पुरस्कार

पुणे : असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज (ए.एस.आर.टी.यु.) च्या ६४ व्या वार्षिक परिषदेमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ने  पीएमपीएमएल डिझाईन स्टुडिओ  ही नाविन्यपूर्ण संकल्पना पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांचे मार्गदर्शनाखाली वाहतूक नियोजन विभागाने ए.एस.आर.टी.यु. कडे मांडली होती. ए.एस.आर.टी.यु. या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने सभासद असलेल्या वाहतूक संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये उत्तम कार्यप्रणाली, नाविन्यपूर्ण संकल्पना या बाबींसाठी नामांकने मागविली होती.

पुणे शहरातील आर्किटेक्ट तथा सर्ग स्टुडिओचे संचालक  योगेश दांडेकर यांचे कल्पनेतून पीएमपीएमएलच्या वाहतूक नियोजन विभागाकडे पीएमपीएमएल डिझाईन स्टुडिओ ही संकल्पना सादर करण्यात आलेली होती. या संकल्पनेअंतर्गत पीएमपीएमएलचे वाहतूक नियोजन अधिकारी (आय.टी.)  विजय रांजणे यांनी ए.एस.आर.टी.यु. यांचेकडे बसमार्गाचे लाईन मॅप, जंक्शन मॅप, बसथांब्यावरील वारंवारितेचे वेळापत्रक, बस कनेक्टिव्हिटी मॅप व बसथांब्यांचे पोलचे मॅप प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी मुख्य बसस्थानकांवर लावण्याबाबतची संकल्पना मांडलेली होती.

नवी दिल्ली येथे दिनांक १५ मार्च २०२४ रोजी पार पडलेल्या ए.एस.आर.टी.यु. च्या ६४ व्या वार्षिक परिषदेमध्ये ए.एस.आर.टी.यु. चे अध्यक्ष तथा भारत सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन, ए.एस.आर.टी.यु. चे उपाध्यक्ष  राव यांच्या हस्ते व ए.एस.आर.टी.यु. चे संचालक टी. सूर्याकिरण यांचे प्रमुख उपस्थितीत  पीएमपीएमएल डिझाईन स्टुडिओ या नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी पुरस्कार स्वरूप दिले जाणारे मानचिन्ह पुणे महानगर परिवहन महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर व मुख्य वाहतूक व्यवस्थापक (संचलन)  सतिश गव्हाणे यांनी स्वीकारले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading