“भारत जोडो न्याय यात्रा” समापन समारोह’ सभेत ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे झंझावाती भाषण
मुंबई : वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आणि इंडियामध्ये आहे की नाही, याबद्दल संभ्रम मिटलेला नसला तरी आज इंडिया आघाडीच्या शिवतीर्थावरील सभेत प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिले गेले. या सभेला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या शेजारीच त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. ईव्हीएम विरोधात आपल्याला लढा उभारावा लागेल. त्यासाठी राहुल गांधींनी पुढाकार घ्यावा आम्ही तुमच्या सोबत राहू असे आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी दिले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत आपण सोबत असू किंवा नसू पण आपल्याला भाजपच्या विचारधारेविरोधात लढावे लागेल. त्यांच्या या वक्तव्याने वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल अजुनही संभ्रमावस्था असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
- ‘देश मोदी का परिवार’ म्हणाऱ्या मोदी यांनी स्वतःच्या पत्नीला एकत्र घेऊन रहावे.
- आपल्याला आता सोबत लढलं पाहिजे. एकटं लढा किंवा सोबत लढा पण, लढलं पाहिजे.
- फ्युचर गेमिंग कंपनी आहे, या कंपनीचा प्रॉफिट 200 कोटी आहे, त्यांनी 1300 कोटीचे बाँड कुठून घेतले ? मी अशा अनेक कंपन्यांची नाव सांगू शकतो, मग मोदींना, या कंपन्यांना सवाल विचारला पाहिजे का नाही. लोकांनी विचारलं पाहिजे. ईडीने या कंपन्यांना विचारलं पाहिजे. पण कुणीच काही बोलत नाही.
- मोदींची पुढील वर्षात देशाचे पंतप्रधान राहणार नाही.
- हिंदू धर्मामध्ये कुटुंबाबद्दल आपण प्रसार केला पाहिजे. त्यामुळे मोदींनी आपल्या कुटुंबासोबत राहिलं पाहिजे, हा व्यक्तिगत मुद्दा आहे. पण या चर्चांना RSS ने सुरुवात केली आहे. नॅशनल क्लचरबद्दल तेच बोलले होते, पण आता ते विसरले आहे. त्यामुळे आता आपणच हा प्रश्न विचारला पाहिजे.
- ईव्हीएम मशीनसाठी मी कोर्टात लढा देत आहे. ही मशीन अमेरिकेमधून येत असते. या मशीनमध्ये जी चीप येते, ती 20 ते 25 रुपयांमध्ये येत असते. त्यामुळे यामध्ये फेरफार केला जाऊ शकतो.
- राहुल गांधी यांना माझी विनंती आहे, ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार शक्य आहे, पेपर ट्रेलिंग आणि व्होट यात फरक दिसून येत आहे. त्यामुळे सगळ्या विरोधकांनी निवडणूक आयोगाला घेरलं पाहिजे. पेपर ट्रेलिंग होऊ शकतं. राहुल गांधी यांनी आवाहन केलं पाहिजे, आम्ही सगळे तुमच्यासोबत एकत्र येऊ.
