मोदी जाणीवपूर्वक देशात अराजकता आणि द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत : राहुल गांधी
मुंबई : नरेंद्र मोदींची 56 इंचाची छाती नाही तर ते एक पोकळ व्यक्ती आहे. नरेंद्र मोदी फक्त मुखवटा आहे. त्यांच्या आडून एक शक्ती हा देश चालवत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी शिवतीर्थावरील सभेतून केला. नरेंद्र मोदी फक्त देशातील लोकांचे लक्ष विचलित करत आहे. दिवे लावा, थाळी वाजवा सांगून ते देशाचे लक्ष्य मुळ प्रश्नावरुन विचलित करत आले आहेत. ही शक्ती जाणीवपूर्वक देशात अराजकता आणि द्वेष पसरवण्याचे काम करत आहे, असा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, या देशाची संस्कृती द्वेषाची नाही, प्रेमाची आहे. या देशात जेवढे महान लोक होऊन गेले त्यांनी प्रेमाचाच संदेश दिला आहे. महात्मा गांधी, भगवान बुद्ध, प्रभू श्रीराम या सर्वांनी प्रेमाचाच संदेश दिला आहे.
राहुल गांधी म्हणाले, मी भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा केली. मला ही यात्रा करावी लागली. कारण देशाचे लक्ष विचलीत करण्यात येत होते. लोकांना त्यांचे प्रश्न कोणत आहेत याकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा करावी लागली.
देशाच्या विविध राज्यातील नेते येथे एकत्र आले आहेत. आम्ही एकत्र आलो ते एका राजकीय पक्षाच्या विरोधात लढत आहोत असे नाही. आम्ही एका व्यक्तीच्या विरोधातही लढत नाही. आम्ही भाजपच्या विरोधात आहोत ना, नरेंद्र मोदींच्या विरोधात लढत आहोत, कारण नरेंद्र मोदी हे 56 इंचाची छाती असलेले नेते नाहीत तर ते एक पोकळ व्यक्त आहेत. नरेंद्र मोदींचा फक्त चेहरा पुढे करुन एक शक्ती हा देश चालवत आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, या देशाची संस्कृती नष्ट करणाऱ्या शक्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे आमदार, खासदार हे भाजपमध्ये जात आहेत, ते त्याच शक्तीला घाबरून जात आहेत.
देशामध्ये असंतोष – अराजकता कायम ठेवण्याचे काम सुरु आहे. मणिपूरमध्ये याच शक्तीने यादवी युद्ध सुरु केले आहे. भाऊ भावाला गोळ्या मारत आहे. राहुल गांधी म्हणाले की, मणिपूरमध्ये गेलो तेव्हाच ठरवले की यात्रेचा शेवट धारावीत करायचा आहे. धारावी हे या देशाच्या कौशल्याची राजधानी आहे. धारावीमध्ये असलेल्या कौशल्याच्या जोरावर धारावीतील तरुण, छोटे उद्योजक, कारागिर हे चीनच्या शेंजन शहराशी स्पर्धा करु शकतात. मात्र त्यांना सरकार मदत करत नाही. धारावीतील उद्योगांना मोठे होऊ दिले जात नाही, यामागेही तीच शक्ती कारणीभूत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
– राहुल गांधीला ही यात्रा करावी लागली. कारण देशाचे लक्ष विचलीत करण्यात येत होते. लोकांना त्यांचे प्रश्न कोणत आहेत याकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा करावी लागली.
– आम्ही एका राजकीय पक्षाच्या विरोधात लढत आहोत असे नाही. आम्ही एका व्यक्तीच्या विरोधातही लढत नाही. आम्ही भाजपच्या विरोधात आहोत ना, नरेंद्र मोदींच्या विरोधात लढत आहोत. फक्त एका व्यक्तीला चेहरा बनवून पुढे केले आहे.
– हिंदू संस्कृतीमध्ये शक्तीचा उल्लेख आहे. आम्ही त्या शक्तीच्या विरोधात लढत आहोत.
– शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे आमदार, खासदार हे भाजपमध्ये जात आहेत, ते त्याच शक्तीला घाबरून जात आहेत.
– देशातील तरुण रात्रंदिवस मेहनत करत आहे. लष्करात भरती होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना अग्निवीर बनवले गेले. यामागे देखील तीच शक्ती आहे.
– मणिपूरमध्ये याच शक्तीने यादवी युद्ध सुरु केले आहे. भाऊ भावाला गोळ्या मारत आहे.
– मणिपूरमध्ये गेलो तेव्हाच ठरवले की यात्रेचा शेवट धारावीत होणार. धारावी हे या देशाच्या कौशल्याची राजधानी आहे.
– धारावी चीनच्या शेंजन शहराशी स्पर्धा करु शकते. मात्र त्यांना तेवढे करु दिले जात नाही.
– देशाच्या 22 लोकांकडे एवढी संपत्ती आहे की, देशाच्या सर्व लोकांकडे जेवढी संपत्ती आहे.
– अंबानींवर टीका. देशात लग्नासाठी एका दिवसात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु केले जाते. करा, काहीच हरकत नाही, मात्र देशातील इतर लोकांसाठीपण करा.
– देशात 50 टक्के जनता गरीब, दलित, आदिवासी आहे. देशातील माध्यम मालकांची यादी काढा त्यात तुम्हाला एकही दलित, आदिवासी दिसणार नाही. यात यांची चूक नाही.
– देशातील उद्योगपतींची यादी काढली तरी त्यातील पहिल्या 200 कंपन्यांमध्ये तुम्हाला एकही दलित, आदिवासी दिसणार नाही.
– देशाची व्यवस्था 90 अधिकारी चालवतात. मी व्यवस्थेच्या आत राहून हे सर्व पाहिले आहे.
– या 90 मध्ये 3 दलित, 3 आदिवासी आहेत. त्यात तुम्हाला एकही ओबीसी दिसणार नाही.
– देशाचे धोरण ठरवण्याचे काम ही व्यवस्था करत असते. देशातील धनिक आणि ब्यूरोक्रॅट्स हे देश चालवत आहेत.
– ईव्हीएम शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकूच शकत नाही. इलेक्शन कमिशनला आम्ही विनंती केली की या मशिन कसे काम करतात, हे आमच्या तज्ज्ञांना दाखवा, तर ते दाखवायला तयार नाही.
– व्हीव्हीपॅट मशिनमधील पेपर ट्रेलची मोजणी करण्यासही इलेक्शन कमिशन नकार देतो.
– या देशाची संस्कृती द्वेषाची नाही, प्रेमाची आहे. या देशात जेवढे महान लोक होऊन गेले त्यांनी प्रेमाचाच संदेश दिला आहे. महात्मा गांधी, भगवान बुद्ध, प्रभू श्रीराम या सर्वांनी प्रेमाचाच संदेश दिला आहे. आपल्याला महोब्बत की दुकान उघडावे लागेल, असे आवाहन राहुल गांधींना केले.
