Saturday, June 6, 2026
ENTERTAINMENTLatest News

अर्चना सोलंकी यांना दादासाहेब फाळके सिने अवॉर्ड प्रदान

पुणे : ‘दादासाहेब फाळके सिने अवॉर्ड 2024’ हा पुरस्कार सोहळा आज पुण्यात मोठ्या दिमाखात पार पडला. या प्रसंगी मराठी – हिंदी चित्रपटसृष्टी मधील दिग्गजांसाह फॅशन इंडस्ट्री मधील मान्यवर उपस्थित होते.  या रंगारंग सोहळ्यात ‘सस्टेनेबल  फॅशन व्हिजनरी अवॉर्ड’ ने सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना सोलंकी यांना सामाजिक कार्यकर्त्या, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती भोईर यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले. 

एका पंचतारांकित हॉटेल मध्ये संपन्न झालेल्या ‘दादासाहेब फाळके सिने अवॉर्ड 2024’ या  सोहळ्याला बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री, ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के,  अभिनेत्री मोनालीसा बागल, आरती शिंदे, अभिनेता प्रसाद शिकारे, आयोजक अविनाश चकोते आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने झाली, यानंतर गणेश वंदना सादर करण्यात आली. 

पुरस्कारा विषयी बोलताना अर्चना सोलंकी म्हणाल्या, भारतिय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार जबाबदारी वाढवणारा आहे.  ‘सस्टेनेबल  फॅशन व्हिजनरी अवॉर्ड’ साठी आयोजकांनी माझी निवड केली याबद्दल मी त्यांची आभारी आहे. परीक्षकांनी केलेली माझी ही निवड माझ्या भविष्यातील वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading